Pankaja Munde : पराभवानंतर भाजपचा प्लॅन बी, पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार?

Pankaja Munde : पराभवानंतर भाजपचा प्लॅन बी, पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार?

राज्यसभेतील खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. राज्यात उदयनराजे भोसले, पियुष गोयल आणि नारायण राणे यांनी विजयश्री खेचून आणला. या विजयामुळे हे तिघे ही आता लोकसभेचे प्रतिनिधीत्व करतील. त्यामुळे राज्यातील राज्यसभेच्या जागा रिक्त होतील. गोयल आणि राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय योग्य ठरल्याचे निकालातून दिसून आले.   यापूर्वी अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले आहे. भाजपच्या रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठविले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कुणाची लागणार वर्णी?

खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या विजयानंतर भाजपच्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन जागांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचे चित्र होते. त्यानंतर त्यांना पक्षाने राष्ट्रीय पातळीवर सचिवपद देण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत पक्षानं त्यांना बीडमधून तिकीट दिले. पण तिथे त्यांना परभावाचा सामना करावा लागला.पंकजा मुंडे यांना या जागेवरून राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे. लवकरच भाजप नेतृत्व याबाबतचा निर्णय घेणार आहे.

25 जून रोजी राज्यसभा निवडणूक

केरळ आणि महाराष्ट्रातील मिळून चार जागांसाठी 25 जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने त्याविषयीची घोषणा केली आहे. केरळमधील तीन जागा तर राज्यातील एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. केरळमधील विद्यमान खासदार एलराम करीम, बिनॉय विस्वम आणि जोस के मणी ते तिघे 1 जुलै रोजी निवृत्त होतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानं त्यांच्या रिक्त जागेसाठी 25 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 जून आणि नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख 18 जून असेल. 25 जून रोजी निवडणूक होईल. तर सायंकाळी मतमोजणी होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;