शिंदे गटात महाभूकंप?, सहा आमदार ठाकरे गटात येणार? विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठी उलथापालथ

शिंदे गटात महाभूकंप?, सहा आमदार ठाकरे गटात येणार? विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठी उलथापालथ

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच आता महायुतीत चांगलीच चुळबुळ सुरू झाली आहे. शिंदे गट आणि अजितदादा गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. शिंदे गटाला विद्यमान खासदारांच्या जागाही राखता आलेल्या नाहीत. विद्यमान खासदारांपैकी 7 खासदारच निवडून येऊ शकले आहेत. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्यामुळेच शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती आहे. हे सहाही आमदार ठाकरे गटात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचं सूत्रांनी सांगितलं. म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात फार मोठ्या उलथापालथी होणार असल्याचं चित्र आहे.

शिवसेना शिंदे गटाचे 6 आमदार शिवसेना ठाकरेंच्या संपर्कात आहेत. हे सर्वच्या सर्व सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या सहा आमदारांना प्रवेश दिल्यास इतर आमदारही ठाकरे गटात येऊ शकतात, अशी माहिती आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात या मोठ्या घडामोडी होणार असल्याचंही या नेत्याने सांगितल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार आहे.

अनेक लोक संपर्कात

ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी या घडामोडींवर भाष्य करताना अत्यंत तोलूनमापून प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या संपर्कात सहा आमदार असल्याचा आम्ही दावा केला नाही. अनेक लोक दिवाळीपासून आमच्याशी संपर्क करत आहेत. त्यांच्याशी किती संपर्क ठेवायचा? नाही ठेवायचा हा नंतरचा भाग आहे. आमच्यासाठी तो विषय संपला आहे. आम्ही आमच्याच लोकांना घेऊन विधानसभा लढणार आहोत, असं सचिन अहिर म्हणाले.

भाजपमध्येही अस्वस्थता

शिंदे गटातच नाही, तर अजित पवार गट आणि भाजपमध्येही अस्वस्थता आहे. मुंबईत भाजपचे सहा आमदार मागे पडले आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. तेही विचार करत आहेत. पण आमच्याशी कुणीही संपर्क केलेला नाही. लोकसभा निवडणुकीवेळी अनेकांनी संपर्क केला होता. आम्हाला नाही तर आमच्या घरातील माणसांना तिकीट द्या अशी मागणी केली होती. घरातील नाही तर आम्ही सांगू त्या माणसाला तिकीट द्या. आम्ही त्यांना आतून मदत करतो, असं संपर्क करणारे म्हणाले होते. पण आम्ही त्याला नकार दिला होता, असा गौप्यस्फोट सचिन अहिर यांनी केला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाकरे गटाचे 13 खासदार फुटले होते. शिंदे गटाने महायुतीत लोकसभेला 15 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी फक्त त्यांच्या सात जागा निवडून आल्या. म्हणजे आठ ठिकाणी शिंदे गटाचा पराभव झाला. त्यापैकी विद्यमान सहा खासदारांच्या मतदारसंघातही शिंदे गटाला पराभव स्वीकारावा लागला. भाजपने सर्व्हेच्या नावाखाली शिंदे गटावर मोठा दबाव टाकला होता. त्यामुळे भावना गवळी आणि इतरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट नाकारलं होतं. विधानसभा निवडणुकीतही तसंच होण्याची भीती शिंदेंच्या आमदारांना वाटत आहे. उद्धव ठाकरे हे मास लीडर असून त्यांच्याकडेच खरा शिवसैनिक असल्याची भावनाही या आमदारांची झाली असल्याने या आमदारांनी ठाकरे गटाशी संपर्क सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;