मी जिंकले असते, काही लोकांनी स्क्रिप्ट लिहिली अन्…, विदर्भातील माजी खासदाराचा महायुतीला घरचा आहेर

मी जिंकले असते, काही लोकांनी स्क्रिप्ट लिहिली अन्…, विदर्भातील माजी खासदाराचा महायुतीला घरचा आहेर

मी जिंकले असते, काही लोकांनी स्क्रिप्ट लिहिली अन्…, विदर्भातील माजी खासदाराचा महायुतीला घरचा आहेर

लोकसभेचे निकाल हाती येताच त्याचे परिणामच नाही तर पडसाद पण उमटायला लागले आहे. 48 तासांतच अनेकांच्या नाराजी पुढे येत आहे. त्यात ज्यांना लोकसभेसाठी डावलण्यात आले. त्यांनी तर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी त्यांना तिकीट मिळाले असते तर आज चित्र वेगळे असते, असा दावा केला आहे. महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा झटका बसला. महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली. आता पराभवाचे चिंतन आणि कारणं शोधण्यात येत आहे. विदर्भातील शिंदे गटाच्या शिलेदार आणि माजी खासदाराच्या मनातील खदखद अशीच बाहेर आली आहे.

तर मी निवडून आले असते

मला असा वाटते की २५ वर्ष पासून मला निवडून देत आहे. ही जागा शिवसेनेची आहे. ही जागा मला दिली असती तर ही जागा निवडून आली असती, असा दावा भावना गवळी यांनी केला आहे. मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले होते. पण काही लोकांनी स्क्रिप्ट लिहली, भूमिका व्यवस्थित मांडली नाही. त्यामुळे हा विषय झाला. लाखाच्या फरकाने मी निवडून आले असते, असे त्या म्हणाल्या.मी बदल्याचा राजकारण करत नाही. माझा रोष नाही. मी शांत किंवा स्वस्थ बसणार नाही. मी दिलेला शब्द जर पाळला गेला तर येत्या विधानसभा निवडणुकीत अनेक जागांवर फायदा दिसून येईल, असा दावा त्यांनी केला.

भावना गवळींचा रोख कुणावर?

यवतमाळ-वाशिम लोकसभेत महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्याची जबाबदारी पालकमंत्री आणि भाजप आमदारांनी घ्यावे असे त्यांनी मत व्यक्त केले. विधानसभेत उमेदवारी देताना अगोदर सर्व्हे करण्याची मागणी त्यांनी केली. भाजपच्या सर्व्हेत भावना गवळींच्या मागे जनमत नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला, त्याला कोणाला जबाबदार धरण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष असतानाच भावना गवळींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संजय देशमुख झाले विजयी

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी बाजी मारली. तर शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांचा पराभव झाला. संजय देशमुख 94 हजार 473 इतक्या मोठ्या मताच्या अंतराने विजयी झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;