देवाशी कुणी युती करतं का?; कपिल सिब्बल यांनी नरेंद्र मोदी यांना डिवचलं
लोकसभा 2024 निवडणूकांचे निकाल लागले आहेत. आता 17 वी लोकसभा भंग करण्यात आली आहे. आता 18 लोकसभेसाठी बहुमत स्थापन करण्यासाठी भाजपाने आपल्या एनडीएच्या सहकाऱ्यांची जुळवाजुळव सुरु केली आहे. दुसरीकडे प्रसिद्ध वकील आणि कॉंग्रेसचे राज्यसभेचे सदस्य कपिल सिब्बल यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचंड टीका केली आहे. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या काळात मंत्री असलेल्या कपिल सिब्बल यांनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्स ( पूर्वीचे ट्वीटर ) एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल हे नेहमीच भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाकाजावर टीका करीत असतात. मनमोहन सिंह यांच्या काळात मंत्री असलेले कपिल सिब्बल यांनी मोदीवर टीप्पणी केली आहे. त्यांनी ट्वीटरवरील पोस्टमध्ये लिहीलेय की मी मोदींना विचारू इच्छीतो की… काय देवासोबत कोणी युती करु शकतं का ? भाजपाचे सरकार स्थापन करण्यासाठी एनडीएच्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. जास्तीत जास्त मित्र जोडण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यावर कपिल सिब्बल यांनी मार्मिक शब्दात भाष्य केले आहे. अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत आपण बायोलॉजिकल नाही. तर परमेश्वरानेच मला पृथ्वीवर लोकांचे कल्याण पाठविले आहे, असे म्हटले होते.
kapil Sibal Attack PM Narendra Modi at x
Modiji
Main poochta hoon ?
Kya Bhagwan ke saath koeee coalition kar sakta hai ?
— Kapil Sibal (@KapilSibal) June 6, 2024
कपिल सिब्बल यांनी मार्च महिन्यात इलेक्ट्रोरल बॉंडच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठी टीका केली होती. त्यावेळी कपिल सिब्बल म्हणाले होते की इलेक्ट्रोलची माहीती बाहेर पडल्यानंतर यात लाभाच्या बदल्यात लाभ देण्याचा कुठे न कुठे प्रयत्न झाले आहे. कोणीतरी म्हटले होते की, ‘खाऊंगा ना खाणे दुंगा’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या आधी भ्रष्टाचार संपविण्याची घोषणा केली होती. त्यावेळी या वाक्याचा उपयोग मोदी यांनी केला होता.
22 एप्रिल रोजी पंतप्रधानांनी प्रचारात घुसपेटीयों को संपत्ती वाटणारे अशी टीका कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर केली होती. तेव्हा कपिल सिब्बल म्हणाले की एका बाजूला तुम्ही राममंदिराचे उद्घाटन करता, आणि दुसरीकडे द्वेष पसरवता. पंतप्रधानांनी सबका साथ, सबका विकासची घोषणा केली होती. पंतप्रधानांच्या कुटुंबियांनी देखील संस्कृती त्यांना शिकवली नसेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List