Monsoon : राज्यात शनिवारपासून जोरदार पाऊस, मान्सून आज तळकोकणात दाखल होणार

Monsoon : राज्यात शनिवारपासून जोरदार पाऊस, मान्सून आज तळकोकणात दाखल होणार

राज्यात शनिवारपासून जोरदार पाऊस सुरु होणार असल्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या वाटचालीसाठी राज्यात पोषक स्थिती आहे. बुधवारी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मॉन्सून गोव्यातच अडखळला आहे. आज तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये दोन दिवस आधीच पाऊस दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या १० जूनपर्यंत मान्सून मुंबई आणि महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

प्री मान्सूनची शक्यता

मान्सून दाखल होण्याच्या आधी राज्यात प्री मान्सून पाऊसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह काही भागात हा प्री मान्सून पाऊस पडू शकतो. पण प्रत्यक्षात मात्र मान्सूनच्या पावसाला १० जूननंतरच सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढल्याने मुंबईसह राज्यात लोकं हैराण झाले आहेत. पण येत्या २-३ दिवसात प्री मान्सून पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

उत्तर भारतात उष्णतेची प्रंचड लाट आहे. गुजरात, राजस्थान आणि दिल्लीमध्ये तापमानाने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. राजस्थानाच तापमान ५० अंशांच्या वर गेला आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे घराबाहेर पडणे ही कठीण झाले आहे.

मान्सून दक्षिण महाराष्ट्रात होणार दाखल

हवामान खात्याच्या माहितीनुसार आता नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत आहे.पुढील 3 दिवसात नैऋत्य मान्सून हा कर्नाटकच्या उर्वरित भागात त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील काही भाग पोहोचेल. नैऋत्य मान्सून 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

शनिवारी मान्सून कोकण किनारपट्टीवर धडकू शकतो. ज्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने म्हटले की, आजपासून अनेक भागाच अंशतः ढगाळ वातावरण राहिल. काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.

उत्तर-पश्चिम भारतात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की आसाम आणि मेघालयमध्ये 07 ते 08 जून दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

IMD नुसार, आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये गडगडाटी वादळासह पाऊस होण्याची शक्यता आहे. केरळ, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, कर्नाटकात गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ईशान्येकडील राज्यांना अजूनही उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. या राज्यांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. IMD ने सांगितले की 8 ते 9 जून दरम्यान उत्तर भारतात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;