Yugendra Pawar : निकालानंतर युगेंद्र पवार यांचा पहिला बळी; अजितदादांचा पहिलाच सर्वात मोठा डाव; बारामतीच्या आखाड्यात काय घडलं?

Yugendra Pawar : निकालानंतर युगेंद्र पवार यांचा पहिला बळी; अजितदादांचा पहिलाच सर्वात मोठा डाव; बारामतीच्या आखाड्यात काय घडलं?

लोकसभा निकालाने राज्यातील सत्ता समीकरणं बदलली आहे. महायुतीला लोकसभा निकालाने मोठा झटका बसला आहे. डॅमज कंट्रोल कसं करावं यासाठी डावेपच आखले जात आहे. मंथन होत आहे. बैठकांचं सत्रे सुरु आहेत. महाविकासा आघाडीने मारलेली मुसंडी अनेक आमदारांसाठी अस्वस्थ करणारी आहे. राज्यात मोदी मॅजिकचा करिष्मा दिसला नाही. त्यातच बारामतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यात निकालाचा राग युगेंद्र पवार यांच्यावर निघाल्याची चर्चा होत आहे. नेमकं काय आहे प्रकरण?

कुस्ती संघाच्या अध्यक्षपदावरुन हटविले

बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवारांनी युगेंद्र पवारांना बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदावरुन हटविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युगेंद्र पवार बारामती कुस्ती संघाचे अध्यक्ष होते. त्यांचे कामही जोरदार होते. पण काल झालेल्या एका बैठकीला उपस्थित न राहिल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. तर निवडणूक संपताच युगेंद्र पवारांना हटवल्याने चर्चांना उधाण आले आहे. निकालाचा राग युगेंद्र पवार यांच्यावर निघाल्याची चर्चा होत आहे.

युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया काय?

याप्रकरणात युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला काही सांगता येणार नाही. काही लोकांनी मला पण सांगितलं की परवा कुठेतरी एक मीटिंग झाली. पण माझ्या कानावर आले पण माझ्यापर्यंत कुठल्याही ऑफिशियल चैनल कडून काय अजून माझ्याकडून काय पत्र किंवा असं काय आलेलं नाही. तीन-चार वर्षांपासून कुस्ती संघाची जबाबदारी माझ्याकडे घेतली. त्याच्या आधी श्रीनिवास बापू ते बघत होते. चांगलं काम केलंय. तिथले पैलवान चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना सोयी सगळे सुविधा देऊ शकलो. दादांनी पण तिथे खूप मदत केली आहे. दादांनी पण तिथं आम्हाला इमारतीला मदत केली. त्यामुळे पैलवानांना प्रोत्साहन मिळाले.”

कोण आहेत युगेंद्र पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार हे चिरंजीव आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बारामतीत कुस्ती स्पर्धेचं आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवार आणि युगेंद्र यांचेही फोटो झळकले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर हल्लोबोल केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;