अजित पवार गोटातील आमदार अस्वस्थ? मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, राज्यात एकामागून एक वेगाने घडामोडी

अजित पवार गोटातील आमदार अस्वस्थ? मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, राज्यात एकामागून एक वेगाने घडामोडी

लोकसभा निकालाने राज्यातील समीकरणे बदलली आहेत. मोठ्या यशाची अपेक्षा असताना पदरात पराभव आल्याने महायुतीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. पराभवाची कारणं शोधली जात आहे. महाविकास आघाडीने मारलेली मुसंडी ही महायुतीसाठी धक्कादायक आहे. राज्यातील अंडरकरंट दुर्लक्षित केल्याने हा फटका बसल्याची चर्चा रंगली आहे. राज्यात वेगाने घडामोडी घडत आहे. केद्रांत सत्ता स्थापन्याच्या हालचाली वाढल्यानंतर महायुतीतील नेते, खासदार दिल्लीकडे कुच करणार आहेत. पण त्यापूर्वी मुंबईत बैठकांमागून बैठकांचे सत्र सुरु आहे.

आमदारांमध्ये अस्वस्थता

राष्ट्रवादी काँग्रेसची आज अजित पवार यांच्या निवास्थानी बैठक होत आहे.
महायुतीला राज्यात मिळालेले अपयश आणि राष्ट्रवादीच्या उमेदवांराचा झालेला पराभव यावर बैठकीत चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीला मिळालेले यश यामुळे अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता अशी चर्चा आहे. शरद पवार गटाकडून काही आमदारांना सातत्याने बोलले जात आहे. अनेक आमदार संपर्कांत किंवा आमदार परत येऊ शकतात असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. महायुतीला मिळालेले अपयश यामुळे आमदारांना एकसंध ठेवणे अजित पवार यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.

वर्षा बंगल्यावर बैठक

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांची बैठक बोलावली आहे. आज दुपारी १ वाजता सर्व खासदारांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक होत आहे. रात्री मुख्यमंत्री सर्व खासदारांसोबत दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत सरकार स्थापनेच्या वेळी ते प्रत्यक्ष हजर असतील.

विजयानंतर खासदारांची वर्षा बंगल्यावर पहिली बैठक होत आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रात दोन मंत्रीपदे आणि एक केंद्रीय राज्य मंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. खासदार प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे आणि श्रीकांत शिंदे हे मंत्रीपदाच्या रेसमध्ये असल्याचे समजते.

फडणवीसांची दिल्लीवारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत. राज्यातील पराभवानंतर ते दिल्लीत जाणार आहेत. त्यांनी काल उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. आज फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या निर्णयावर ही चर्चा अपेक्षित आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;