मोदी वयाच्या पंच्चाहत्तरीनंतर पंतप्रधान राहणार नाही, कुणी केला हा सर्वात मोठा दावा?

मोदी वयाच्या पंच्चाहत्तरीनंतर पंतप्रधान राहणार नाही, कुणी केला हा सर्वात मोठा दावा?

लोकसभा निवडणुकीचा निकाला लागला असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असं असलं तरी भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही. बहुमतापासून दूर असल्याने भाजपला इतर मित्रपक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागणार आहे. पंतप्रधान मोदी लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार असून येत्या ८ जून रोजी शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदाची निवडणूक ही फारच वेगळी ठरली. एक्झिट पोलचे आकडे देखील चुकीचे ठरले आहेत.

अनिल थत्ते यांनी देखील निवडणुकीच्या या चित्रावर आपलं मत सांगितलं आहे. ते म्हणाले की, ‘रामलल्लाचे बोट धरून जाणारे अवतारी पुरुष मोदी नाहीत. रामाने अनेकांचे बोट धरून घेऊन गेले. मात्र तुम्ही रामाचे बोट कसे धरून जाताय हे अंगलट आलं. त्यामुळे त्यांचा हा पराभव झाला. रामापेक्षा तुम्ही स्वतःला प्रेझेंट करायला गेले. राम दाखवले मात्र तुम्ही स्वतःचे दर्शन घडवलं हे लोकांना आवडले नाही.’

‘संविधान मधील काही कलमे त्यांना बदलायचे होते. त्यामुळे दलित आणि मुस्लीम हा फॅक्टर परिणामकारक झाला. अजित पवार हे शिंदे आणि फडणवीस यांच चॉईस नव्हतं. अजितदादा हे लादलेल ओझं होतं. राज ठाकरे यांच्यामुळे काय प्लस झालं मायनस झालं. अजित पवार यांना स्वतःच्या पत्नीला निवडून आणता आले नाही. अजितदादांच्या सीट ह्या भाजपकडे पाहिजे होत्या. अजित दादांचा पक्ष मोठ्या प्रमाणात फुटणार. मला जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं होतं अजित पवार यांचे निम्मे लोक आमच्या संपर्कात आहे ते कधीही फुटतील. हे माझ्या मनाच नाही.’

‘फडणवीसांच्या विरोधातली लॉबी स्ट्रॉंग आहे. त्यांना वाटतं फडणवीस जावे. फडणवीस सर्वांना डोही जड झाले आहे. ते एकटे स्वतःला मिनी मोदी समजत आहेत. फडणवीस स्टंट करणारे आहेत.’

‘सुप्रिया सुळे विजयी झाल्यात. कारण तेथे भाजपने सुनेत्रा पवार यांचं काम केले नसेल. भाजपने विरोधात काम केले आहे. नितीश कुमार पलटूराम आहेत. पहिले ते पलटी मारून जातील. 2014 साली nda मध्ये असताना upa मध्ये प्रस्ताव मांडला होता हे दोघेही बिन भरवसे आहे. हे सरकार पडेल असे वाटतेय.’ असं ही ते म्हणालेत.

‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत’

‘मोदी 75 नंतर पंतप्रधान राहणार नाही. मोदी सीट आणतील आता तो विश्वास राहिलेला नाही. महाघाडीचे सरकार आले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील. फडणवीस यांना चिंतन नाही तर चिंता करण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपने मदत केली नाही. आत्मपरीक्षण भाजपने कधीच केलं नाही. फडणवीस यांच्या विरोधात अनेक लोक आहेत.’

‘नरेश मस्के जिंकले नाही तर एकनाथ शिंदे जिंकले आहेत. नरेश मस्के यांना या लोकसभेत काहीच महत्त्व नाही. एकनाथ मॅजिक चालल म्हणून नरेश मस्के निवडून आले. नारायण राणे यांची पुण्याई स्वतःला तारून गेली म्हणून ते जिंकले.’

‘मी अमोल कीर्तीकर यांनाच विजय मानतो. कारण अमोल कीर्तीकर फक्त खिचडी मध्ये होते. वायकर मात्र अनेक ठिकाणी भ्रष्टाचारी होते. अनेक फायदे त्यांनी ठाकरेंकडून करून घेतले आहेत.’ असं ही अनिल थत्ते यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;