प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या किती जागा पाडल्या?; राज्यभरात किती मते मिळाली?

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या किती जागा पाडल्या?; राज्यभरात किती मते मिळाली?

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात वंचित आघाडीचा महाविकास आघाडीला फारसा फटका बसलेला दिसत नाहीये. मागच्यावेळी वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला 8 जागांवर नुकसान सोसावं लागलं होतं. यावेळीही महाविकासला किमान तीन जागांवर फटका बसला आहे. तर गेल्यावेळीच्या तुलनेत यंदा वंचितला अत्यंत कमी मते मिळाल्याचं दिसून येत आहे. म्हणजेच वंचितला जनतेने साफ नाकारल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

आघाडीला चार जागांवर फटका

वंचितमुळे महाविकास आघाडीच्या चार जागा पडल्या आहेत. अकोला, बुलढाणा, हाकणंगले आणि वायव्य मुंबईत वंचितमुळे महाविकास आघाडीला फटका बसल्याचं दिसत आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर स्वत: उभे होते. या ठिकाणी तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत आंबेडकर यांना 2,76,747 मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसचे अभय पाटील अवघ्या 40,626 मताने पडले. या ठिकाणी आंबेडकर महाविकास आघाडीकडून उभे असते तर जिंकून आले असते. किंवा आंबेडकरांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असता तर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असता.

बुलढाण्यातही ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर पडले. त्यांचा 29 हजार 479 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी वंचितच्या वसंतराव मगर यांनी 98 हजार 441 मते घेतली. ही मते खेडेकर यांच्या पारड्यात गेली असती तर त्यांचा विजय निश्चित झाला असता.

हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील यांचा अवघ्या 13 हजार 426 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी वंचितचे उमेदवार डीसी पाटील उभे होते. डीसी पाटील यांना 32 हजार 696 मते मिळाली. त्याचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला फटका बसला.

वायव्य मुंबईत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात वंचितचे उमेदवार परमेश्वर रणशूर यांनी 10 हजार 52 मते घेतली. त्यामुळे ठाकरे गटाला फटका बसल्याचं दिसून आलं आहे.

कोणत्या उमेदवाराला किती मते

उमेदवाराचे नावमतदारसंघमते
प्रकाश आंबेडकर अकोला276747
दिलीप खेडेकर नगर13749
अफसर खान औरंगाबाद69266
अशोक हिंगेबीड50867
संजय केवट भंडारा-गोंदिया24858
वसंतराव मगरबुलढाणा 98441
राजेश बेले चंद्रपूर21980
मालती ढोमसे दिंडोरी37103
हितेश मडवी गडचिरोली-चिमूर15922
डीसी पाटील हातकणंगले32696
युवराज जाधव जळगाव 21177
प्रभाकर बकलेजालना37810
मोहम्मद शेख कल्याण 18741
नरसिंगराव उगीरकरलातूर42225
रमेश बारस्कर माढा20604
माधवीताई जोशीमावळ27768
सोनल गोंडाणे मुंबई उत्तर6052
संतोष अंबुलगे मुंबई उत्तर मध्य8288
दौलत खान मुंबई उत्तर पूर्व14657
परमेश्वर रणूशरवायव्य मुंबई10052
अफझल दाऊदनीदक्षिण मुंबई5612
अबूल खान मुंबई दक्षिण मध्य23867
अविनाश भोसीकर नांदेड92512
करण गायकर नाशिक47193
भाऊसाहेब अंधळकर उस्मानाबाद33402
विजया म्हात्रे पालघर10936
पंजाब डख परभणी95967
वसंत मोरे पुणे 32012
कौमुदिनी चव्हाणरायगड19618
मारुती जोशीरत्नागिरी-सिंधुदुर्ग 10039
संजय ब्राह्मणे रावेर59120
प्रशांत कदम सातारा211912
उत्कर्षा रुपवते शिर्डी90929
डॉ. अन्वर शेख शिरूर 17462
15492 वर्धा 15492

आघाडीला पाठिंबा, तिथे काय घडलं?

वंचित आघाडीने सांगली, कोल्हापूर, बारामती आणि नागपूर या चार मतदारसंघात महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. यापैकी कोल्हापूर, बारामती आणि सांगलीत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. तर नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. भिवंडीत त्यांनी अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत सांबरे पराभूत झाले आहेत. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना वंचितने अमरावतीत पाठिंबा दिला होता. तिथे आनंदराज यांचा पराभव झाला आहे. एसजेपीचे यवतमाळ-वाशिमचे उमेदवार डॉ. अनिल राठोड यांनाही वंचितने पाठिंबा दिला होता. राठोड यांचाही पराभव झाला आहे.

एकूण किती मते मिळाली?

या लोकसभा निवडणुकीत वंचितला 14,15,076 मते मिळाली आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला 41,32,446 मते मिळाली होती. म्हणजे या निवडणुकीत वंचितला 27,17,370 मते कमी मिळाली आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;