बारामतीत पराभव होताच मोठ्या भावाच्या अजितदादांना कानपिचक्या; श्रीनिवास पवार नेमकं काय म्हणाले?

बारामतीत पराभव होताच मोठ्या भावाच्या अजितदादांना कानपिचक्या; श्रीनिवास पवार नेमकं काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीचे काही धक्कादायक निकाल लागल आहेत. या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते बारामतीकडे. या मतदारसंघात पवार वि. पवार असा सामना रंगला. सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार अशी लढाई असली तर खरी लढाई ही अजित पवार वि. शरद पवार अशीच असल्याचे चित्र दिसत होते. प्रतिष्ठेच्या या लढाईपायी अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, संपूर्ण पवार कुटुंबाचा पाठिंबा हा सुप्रिया सुळे यांना होता. तर सहानुभूती मिळवत आपल्याला एकटं पाडण्यात आल्याचा दावा अजित पवार यांनी केला. अखेर या लढाईमध्ये सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना दारूण पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण निवडणुकीत पवार कुटुंबाच्या बाजूने बोलणारे, अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी या निकालानंतर पुन्हा एकदा अजित पवारांवर हल्ला चढवला आहे. बारामती ही शरद पवार यांचीच हे सिद्ध झालंय, असंही श्रीनिवास पवार म्हणाले.

काय म्हणाले श्रीनिवास पवार ?

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मतांनी विजयी झाला आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढाई झाली, पण बारामती ही शरद पवारांची आहे हे सिद्ध झालंय. राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं असतं, त्यामुळे कौटुंबिक पातळीवर आम्ही एक आहोत आणि आमचे कुटुंब प्रमुख शरद पवारचं आहेत, अशी भूमिका श्रीनिवास पवार यांनी मांडली. अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

बारामतीचा गड सुप्रिया सुळेंनीच राखला

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात दुरंगी लढत झाली. पवार कुटुंबातील ही लढत चुरशीची झाली नाही. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे एक लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. मात्र सुनेत्रा पवार यांच्या पराभवामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसला. महायुतीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला केवळ एका जागेवरच विजय मिळाला. रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी झाले.

पवार कुटुंबामध्ये झालेल्या या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार  निवडणूक रिंगणात होत्या. नणंद-भावजय यांच्या या लढतीत प्रचार दरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. संपूर्ण कुटुंबाने शरद पवार यांनाच साथ दिली होती.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;