maharashtra lok sabha election result: सुनेत्रा पवार पडणारच होत्या?, हसन मुश्रीफ नक्की काय म्हणाले?

maharashtra lok sabha election result: सुनेत्रा पवार पडणारच होत्या?, हसन मुश्रीफ नक्की काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आता विजय-पराभवाची चर्चा सुरु झाली आहे. विजयाचा जल्लोष सुरु आहे तर दुसरीकडे पराभवाची जबाबदारी निश्चित केली जात आहे. त्यावेळी विविध राजकीय नेत्यांकडून विविध प्रकारची वक्तव्य केली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी धक्कादायक विधान केले आहे. बारामतीमध्ये लोकसभेसाठी सुप्रिया सुळे अन् विधानसभेसाठी अजितदादा असे लोकांच्या मनात होते, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार होतो, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना माहीत होते की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.

कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध

देशात अनेक ठिकाणी पडझड झाली, त्यात कोल्हापूरचा सामावेश झाला. कोल्हापूरमध्ये जवळजवळ 6 लाख लोकांनी संजय मांडलिक यांना मतदान केले आहे. संजय मांडलिक यांना कागलमधून मताधिक्क मिळाले नाही, त्याचा धक्का आम्हाला बसला आहे. पण आम्ही खचून न जाता विधानसभा निवडणुकासाठी कामाला लागलो आहेत. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला होता, त्याच्या नाराजीचा देखील फटका बसला आहे. आम्हाला मागच्या वेळी एक जागा होता ती कायम आहे, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

लोकांच्या मनात असे काही…

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना लोकसभेसाठी पाठिंबा द्यावा आणि विधानसभेला अजितदादा यांना पाठिंबा द्यावा, असे लोकांच्या मनात होते. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील, यात शंका नाही. पराभव झाला असला तरी पुन्हा पराभवाचे आत्मचिंतन करुन ज्या बाबी राहिल्या आहेत त्या दुरुस्त करून पुन्हा नव्या जोमाने सुनेत्रा पवार कामाला सुरुवात करतील, असे ते म्हणाले.

निवडणुकीत जय-पराजय होत असतो. तो विनम्रपणे स्वीकारला पाहिजे. विजय झाला तर त्याचा उन्माद करायचा नाही आणि पराजय झाला म्हणून खचून जायचे नाही. आपला नेता हा वाघाच्या काळजाचा आहे. पराभव झाला म्हणून खचून जाणारा नाही. त्यामुळे आपल्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येणार्‍या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;