राज्यात भाजपच्या परभावाला हा फॅक्टर ठरला कारणीभूत, फडणवीसांनी इंडिया आघाडीला लगावला असा टोला

राज्यात भाजपच्या परभावाला हा फॅक्टर ठरला कारणीभूत, फडणवीसांनी इंडिया आघाडीला लगावला असा टोला

राज्यात महाविकास आघाडीने लोकसभेत मोठी मुसंडी मारली. त्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जोरदार प्रदर्शन केले. तर भाजपला राज्यात मोठा फटका बसला. भाजपने लोकसभेसाठी मोठी कंबर कसली होती. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात तळ ठोकून होते. अनेक प्रचार सभा, रॅली आणि तळागळापर्यंत मजबुत संघटन असताना विशेष कामगिरी बजावता न आल्याने त्याचे भाजपने विश्लेषण सुरु केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दांवर मत मांडले.

देशात एनडीचे सरकार

पंडित नेहरूनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद मोदींना मिळाला आहे. भारतामध्ये एनडीएचं सरकार येतंय. हा ऐतिहासिक क्षण आहे. ६२ नंतर पहिल्यांदाच असं घडत आहे. ओडिसात पहिल्यांदा भाजपचं सरकार येत आहे. आंध्रप्रदेशातही चंद्रबाबूंच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार येत आहे. अरुणाचलमध्ये भाजपचं सरकार आलं आहे. विधानसभा निवडणुकीतही जनतेने भाजप आणि एनडीएला कौल दिला आहे, असे फडणवीस म्हणाले.

इंडिया आघाडीपेक्षा तर भाजपला जास्त जागा

इंडिया आघाडी तयार झाली. त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या जागा एकट्या भाजपला मिळाल्या आहेत. सर्व लोकांनी एकत्र येऊन मोठी रणनीती केली. पण तरीही भाजप त्यांच्या पेक्षा मोठी राहिली आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. भाजप आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून सरकार तयार होत आहे.

या फॅक्टरने बिघडवला ‘खेळ’

महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश आलं नाही. किंबहुना अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा महाराष्ट्रात मिळाल्या. राज्यात आमची लढाई जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती. काही प्रमाणात नरेटिव्हच्या विरोधात लढावं लागेल. संविधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला होता. तो नरेटिव्ह ज्या प्रमाणात थांबवायला हवा होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही. हे खरं आहे, असे सांगत फडणवीसांनी या संविधान, घटना बदलण्याचे जे नरेटिव्ह तयार करण्यात आलं. त्यामुळे मोठा फटका बसल्याचे मत मांडले. जनादेश शिरसांवद्य मानून पुढची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. जास्त जागा मिळालेल्या महाविकास आघाडीचं त्यांनी अभिनंदन केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;