कंगना जिंकली, पण या सेलिब्रिटींचं काय झालं? सर्वात धक्कादायक…

कंगना जिंकली, पण या सेलिब्रिटींचं काय झालं? सर्वात धक्कादायक…

बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मोर्चा बॉलिवूडच्या दिशेने वळवला. त्यांनी राजकारणात देखील स्वतःचं स्थान भक्कम केलं. पण लोकसभा निवडणूक 2024 मधील चित्र काहीसं वेगळं ठरलं. पहिल्यांदा निवणुकीसाठी रिंगणात उतरलेली अभिनेत्री कंगना रनौत यांनी बाजी मारली, तर अनेक दिग्गज सेलिब्रिटी उमेदवारांना अपयश स्वीकारावं लागलं… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त लोकसभा निवडणुकीच्या निकालांची चर्चा रंगली आहे.

मनोज तिवारी : भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उभे होते. मनोज तिवारी 137066 मतांनी विजयी झाले आहे. त्यांना 821567 मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसचे कन्हैया कुमार यांना 684501 इतक्या मतांनी दुसऱ्या स्थानावर आहेत.

रवी किशन : रवी किशन यांचा देखील विजय झाला आहे. त्यांनी गोरखपूरमधून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली. रवी किशन यांनी 103526 मतांनी विजय मिळवला आहेय. त्यांनी 585834 जनतेनं मत दिलं आहे. तर समाजवादी पक्षाच्या काजल निषाद 482308 इतक्या मतांनी दुसऱ्या स्थानावर आहेत.

कंगना रनौत : पहिल्यांदा निवडणूक लढवत कंगना रनौत यांनी बाजी मारली आहे. कंगना यांनी 74755 मतांनी विजय मिळवला आहे. कंगना यांना 537022 मत दिलं आहे.

अरुण गोविल : ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल मेरठ लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उभे होते, जिथे ते 10585 मतांनी विजयी झाले, तर समाजवादी पक्षाच्या सुनीता वर्मा 535884 मतांसह दुसऱ्या स्थानावर होत्या. अरुण गोविल यांना एकूण 546469 मते मिळाली.

हेमा मालिनी : मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवलेल्या हेमा मालिनी 293407 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 510064 मते मिळाली, तर काँग्रेसचे मुकेश धनगर 216657 मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले.

दिनेशलाल यादव ‘निरहुआ’: भोजपुरी अभिनेते निरहुआ देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. जेथे त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांनी दिनेशलाल यादव यांना 161035 मतांनी हरवलं.

शत्रुघ्न सिन्हा : दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना देखील अपयशाचा सामना करावा लागला आहे. पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणुक लढवली होती. त्यांना भाजपच्या सुरेन्द्रजीत सिंह आहलूवालिया यांचा विजय झाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;