Yusuf Pathanची दणक्यात ‘ओपनिंग’, क्रिकेटरकडून विजयाचं श्रेय ‘या’ तिघांना
7 टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अखेर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. विविध एक्झीट पोलनुसार पुन्हा एकदा देशात भाजप सरकार येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. मात्र 2014 आणि 2019 च्या यशाच्या तुलनेत भाजपला मोठा फटका बसला. एकट्या भाजपने 2019 मध्ये 300 पार मजल मारली होती. मात्र यंदा 2024 च्या निवडणुकीत एनडीएला 300 पार पोहचता आलं नाही. इंडिया आघाडीने अपेक्षेपेक्षा दमदार कामगिरी करत भाजपला 300 पार जाण्यापासून रोखलं. देशभरात अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. काही दिग्गजांना, आजी माजी मंत्र्यांना पराभूत व्हावं लागलं. तर कुणी पहिल्याच झटक्यात विजय मिळवला.
टीम इंडियाचा माजी अष्टपैलू युसूफ पठाण याने धडाक्यात ‘ओपनिंग’ केली. युसूफ पठाण याने पश्चिम बंगालमध्ये बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढववी. या मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि टीएमसी अशी तिरंगी लढत होती. बहरामपूर हा काँग्रेसचा गेल्या 25 वर्षांपासून बालेकिल्ला होता. मात्र युसूफ पठाणने तब्बल 5 टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांना पराभूत करत पहिल्याच झटक्यात विजय मिळवला. युसूफ पठाण 85 हजारपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाला.
युसूफ पठाणला एकूण 5 हजार 24 लाख 516 मतं मिळाली. त्यानंतर काँग्रेसच्या अधिक रंजन चौधरी यांना 4 हजार 39 हजार 494 मतं मिळाली. तर भाजपच्या डॉक्टर निर्मल कुमार साहा यांना 3 लाख 71 हजार 885 मतं मिळवण्यात यश आलं. युसूफ पठाणच्या विजयामुळे काँग्रेसला आपल्या 25 वर्षांच्या बालेकिल्ल्यावर पाणी सोडावं लागलं. अधीर रंजन चौधरी 1999 पासून ते आतापर्यंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. मात्र जनतेने पुढील 5 वर्षांसाठी युसूफ पठाणला पसंती दिली आहे. युसूफ पठाणने विजयानंतर एक्स (आधीचं ट्विटर) पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
युसूफ पठाणची सोशल मीडिया पोस्ट
I am humbled by the victory in Berhampore. This success is for the people, dedicated party workers, and leaders. A big thank you to @MamataOfficial and @abhishekaitc for their support. Together, we will continue to drive #Berhampore development forward #TMC
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) June 4, 2024
यूसुफ पठाणने काय म्हटलं?
यूसुफ पठाणने या विजयानंतर मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच पक्षश्रेष्ठींचं जाहीर आभार व्यक्त केले. “हे यश जनतेचे, समर्पित कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे आहे खूप आभार”, असं यूसुफने म्हटलं. तसेच यूसुफने सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय सचिव आणि खासदार अभिषेक बॅनर्जी या दोघांचं समर्थनासाठी आभार व्यक्त केले. एकत्रितपणे आम्ही बहरामपूरच्या विकासाच्या दृष्टीने कार्य करु, अशी ग्वाही युसूफ पठाणने दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List