Lok Sabha Elections Result 2024: स्मृती इराणी यांची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?
लोकसभा निवडणुकीचे सर्व कळ हाती आले आहेत. भाजपला 2014 आणि 2019 च्या तुलनेत यंदा जबर फटका बसला आहे. भाजपचं संख्याबळ घटलं आहे. एकट्या भाजपने 2019 च्या निवडणुकीत 300 पार मजल मारली होती. मात्र यंदा 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला 300 चा आकडाही गाठता आलेला नाही, इतकंच काय एनडीएलाही ते जमलेलं नाही. भाजपला महाराष्ट्र आणि प्रामुख्याने उत्तर प्रदेशमधून अनपेक्षित निकालाचा सामना करावा लागला. अनेक दिग्गज, आजी माजी मंत्र्यांना पराभूत व्हावं लागलं. भाजप सरकारमध्ये मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांनाही पराभवाची झळ बसली आहे. काँग्रेसच्या राहुल गांधी यांना 2019 साली अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यंदा अपयशी ठरल्या आहेत. काँग्रेसच्या किशोरी लाल (पुरुष) यांनी स्मृती इराणी यांच्यावर 1 लाख 67 हजार 196 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. स्मृती इराणी यांनी या पराभवानंतर पत्रकार परिषद घेतली. स्मृती ईरानी यांनी मतदारांचं, कार्यकर्त्यांचं आणि पक्षश्रेष्ठींचे आभार मानले.
स्मृती इराणी काय म्हणाल्या?
“मला वाटतं की आजचा जनतेचे आभार व्यक्त करण्याचा दिवस आहे, जे जिंकले त्यांना शुभेच्छा देण्याचा दिवस आहे. संघटनेचा स्वभाव हा विश्लेषण करण्याचा आहे आणि संघटन ते करेल. एक लोकप्रतिनिधी या नात्याने माझं सौभाग्य आहे की मी प्रत्येक गावात जाऊन काम केलं. विजय-पराभवानंतर मी लोकांसह जोडली गेली आणि हेच माझ्या जीवनातील सौभाग्य आहे”, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं.
मी भविष्यातही अमेठीतील लोकांची सेवा करत राहणार. एका दशकापेक्षा अधिक काळ मी एक गावातून दुसऱ्या गावात जात लोकांची मदत केली. मी लोकांचं जीवन सावरण्यात, आशा आणि अपेक्षा कायम राखण्यात, मुलभूत सुविधांवर काम करण्यात वेळ दिला. मी रस्ते, नाले, बायपास, मेडिकल कॉलेज आणि खूप काही बनवण्यासाठी काम केलं. विजय-पराभव प्रत्येक स्थितीत माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्यांची मी कायम ऋणी आहे. आज जल्लोष करणाऱ्यांना शुभेच्छा. तसेच जे विचारत आहेत “हाव इज द जोश?”, तर मी म्हणेन, जोश अभी भी हाई है, सर”, असं स्मृती यांनी स्पष्ट केलं.
स्मृती इराणी यांची पहिली प्रतिक्रिया
हमने पूर्ण निष्ठा से अमेठी की सेवा की और आगे भी संगठन की शक्ति से सेवा करते रहेंगे। हार या जीत के बावजूद लोगों से मैं जुड़ी और यह मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य है: @SmritiIrani जी pic.twitter.com/rvDQtvjYE2
— Smriti Irani Office (@SmritiIraniOffc) June 4, 2024
“मी भाजपच्या सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांचं आभाव व्यक्त करते, ज्यांनी पूर्ण निष्ठेने मतदारसघात पक्षाची सेवा केली. तसेच योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते, त्यांनी 30 वर्षांचं काम अवघ्या 5 वर्षात पूर्ण केलं. मी विजयी उमेदवारांचं अभिनंदन करते”, असं इराणी म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List