Nagina UP Lok sabha Final Result : चंद्रशेखर आझाद 1 लाख 51 हजार मतांनी विजयी, भाजपच्या ओम कुमार यांचा पराभव

Nagina UP Lok sabha Final Result : चंद्रशेखर आझाद 1 लाख 51 हजार मतांनी विजयी, भाजपच्या ओम कुमार यांचा पराभव

उत्तर प्रदेश येथील नगीना लोकसभा निवडणुकीत भिम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांचा 1 लाख 51 हजार मतांनी विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या ओम कुमार यांचा पराभव केला आहे. यंदा नगीना लोकसभा मतदारसंघ चंद्रशेखर यांच्या उमेदवारीमुळे चर्चेमध्ये आला होता. येथे चंद्रशेखर आणि भाजप उमेदवार यांच्यात मुख्य चुरशीची लढत झाली. या जागेवर समाजवादी पार्टीने मनोज कुमार आणि बहुजन समाजवादी पार्टीने सुरेंद्र पाल यांना तिकीट दिले होते.

युपीतील नगीना लोकसभा मतदारसंघाची भिम आर्मीचे नेते तसेच आझाद समाज पक्षाचे नेते चंद्रशेखर यांच्यामुळे चर्चेत आली होती. चंद्रशेखर यांनी ही निवडणूक 1 लाख 51 हजार मतांनी जिंकली आहे. येथे भारतीय जनता पक्षाने तीनवेळा आमदार झालेल्या ओम कुमार यांना तिकीट दिले होते. तर समाजवादी पक्षाने माजी न्यायाधीश मनोज कुमार यांना तर बसपाने सुरेंद्र पाल यांना तिकीट दिले होते. परंतू प्रमुख लढत चंद्रशेखर आणि ओम कुमार यांच्यातच झाली.

चंद्रशेखर यांना एकूण 5,12,552 मते मिळाली. 3,61,079 लोकांनी भाजपच्या ओम कुमार यांना तर 1,02,374 लोकांनी समाजवादी पक्षाच्या मनोज कुमार यांना मतदान केले. बहुजन समाज पक्षाचे सुरेंद्र पाल सिंह 13,272 मतांसह चौथ्या स्थानावर राहिले. चंद्रशेखर 1,51,473 मतांनी विजयी झाले आहेत.

2024 मध्ये किती मतदान झाले?

नगीना लोकसभा मतदार संघ हा उत्तर प्रदेशमधील 17 राखीव लोकसभा मतदारसंघापैकी एक आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मतदार संघ अस्तित्वात आला होता. या निवडणुकीत नगीना मतदार संघात पहिल्या टप्प्यात 60.75 टक्के मतदान झाले. 2019 मध्ये या मतदार संघात बहुजन समाजवादी पार्टीचा विजय झाला होता.  गेल्या लोकसभा निवडणुकीत नगीना मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाचे नेते गिरीशचंद्र जाटव विजयी झाले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार डॉ.यशवंत सिंह होते. या निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराला 5,68,378 मते मिळाली, तर भाजप उमेदवाराला 4,01,546 मते मिळाली. या निवडणुकीत बसपाला 56.3 टक्के मते मिळाली आहेत. बसपा उमेदवार 1,66,832 मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;