Mumbai North West Lok Sabha constituency: उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालावरुन शंका, उद्धव ठाकरे आव्हान देण्याच्या तयारीत, म्हणाले….

Mumbai North West Lok Sabha constituency: उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालावरुन शंका, उद्धव ठाकरे आव्हान देण्याच्या तयारीत, म्हणाले….

लोकसभा निवडणूक 2024 चे काही अपवाद सोडले तर आतापर्यंत सर्व कळ हाती आले आहेत. महाराष्ट्रात मविआची जादू पाहायला मिळाली आहे. मविआने महाराष्ट्रात 48 पैकी 29 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र मविआला एका जागेवर निसटता पराभव स्वीकारावा लागला. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अमोल कीर्तीकर यांना अवघ्या 48 मतांनी पराभूत व्हावं लागलं. महायुतीचे रवींद्र वायकर विजयी झाले. या लोकसभा मतदारसंघात मतमोजणी दरम्यान ट्विस्ट पाहायला मिळाला. अमोल कीर्तीकर यांना आधी विजयी जाहीर करण्यात आलं. त्यानंतर रवींद्र वायकर यांनी आव्हान देत फेरमोजणीची मागणी केली.

अमोल कीर्तीकर यांना ईव्हीएममध्ये 4 लाख 995 तर रवींद्र वायकर यांना 4 लाख 994 मतं मिळाली. वायकर यांना ईव्हीएममध्ये कीर्तीकर यांच्या तुलनेत फक्त एकच मत जास्त होतं. त्यानंतर 3 हजार 49 पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. इथे खरा गेम फिरला. अमोल किर्तीकर यांना रवींद्र वायकर यांच्यापेक्षा फक्त 48 मतं कमी पडली. कीर्तीकर यांना 1 हजार 500 तर रविंद्र वायकर यांना 1 हजार 549 मते मिळाली.अशाप्रकारे वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. या निकालाआधी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत शंका उपस्थित करत मतमोजणीला आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“अमोल कीर्तीकर यांचा पराभव जाहीर झालेला नाही. कारण तिकडे नक्की गडबड आहे. आम्ही विचार करतोय की कदाचित त्या निवडणुकीला चॅलेंज देऊ. कारण एकूणच गडबड घोटाळा दिसतोय तिकडे. पहिल्यांदा ईव्हीएममध्ये मतमोजणी झाली मग पोस्टल. तो विषय सुरु आहे. पण आम्ही बहुतेक मतमोजणीला चॅलेंज करु”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाबाबत काय म्हणाला?

इंडिया आघाडी उद्या सत्तास्थापनेबाबत एक्सप्लोर करणार का? तसेच पंतप्रधान पदाबाबत तुम्ही चर्चा करणार का? असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, “निश्चितच सत्तास्थापनेचा दावा करणार. जसं की मी आता म्हटलं की ज्यादिवशी इंडिया म्हणून आमची आघाडी झाली. तेव्हाच आमच्या सर्वांचं ठरलं होतं की कुणा एका व्यक्तिला नाही, पण देशातील हुकुमशाही संपवायची. संविधान वाचवायचं हवं. मग सर्व ठरवून पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू शकतो. मला वाटतं की ते उद्या होईल”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;