नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी या मतदारसंघात महायुतीला मोठा झटका

नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी या मतदारसंघात महायुतीला मोठा झटका

लोकसभा निवडणुकीचा निकाला हळूहळू आता स्पष्ट होत आहे. अनेक मतदारसंघातील निकाल जाहीर झाला आहे. आता मतमोजणी शेवटच्या टप्प्यात आहे. भाजपला देशात मोठा झटका लागला आहे. गेल्या १० वर्षातील सर्वात कमी जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. यंदा भाजपने एनडीएला ४०० जागांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण ३०० जागाच मिळताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रात देखील महाविकासआघाडीला मोठं यश मिळाले आहे. महायुती पेक्षा अधिक जागा जिंकण्यात महाविकासआघाडीला यश मिळाले आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील भाजपचा धुव्वा उडाला आहे.

नाशिक ,दिंडोरी ,धुळे, नंदुरबार ,नगर, शिर्डी या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झालाय. 8 पैकी 6 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचा दावा फोल ठरला आहे. सुजय विखे, भारती पवार, सुभाष भामरे, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, हिना गावित या विद्यमान खासदारांचा पराभव झाला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात मविआची मुसंडी पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच मंत्री गिरीश महाजन तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती आहे. निकालावर कुठलीही प्रतिक्रिया न देता मंत्री गिरीश महाजन तातडीने जळगावातून मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. पत्रकारांनी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता कुठलीही प्रतिक्रिया न देता मंत्री गिरीश महाजन तातडीने मुंबईकडे निघून गेले. जळगाव विमानतळावरून विमानाने गिरीश महाजन मुंबईकडे रवाना झाल्याचे सूत्रांची माहिती आहे.

राज्यात महाविकासआघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. महाविकासआघाडीला २९ जागा आघाडीवर आहेत. तर महायुती १८ जागांवर आघाडीवर आहे.

कोणाला किती जागा?

भाजप १०
शिवसेना ७
राष्ट्रवादी १

काँग्रेस १३
ठाकरे गट ०९
राष्ट्रवादी ०७

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;