महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील विजयी उमेदवार, ‘या’ यादीत तुमचा उमेदवार आहे का?

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील विजयी उमेदवार, ‘या’ यादीत तुमचा उमेदवार आहे का?

देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. गेल्या 10 वर्षांपासून अविरतपणे सत्तेत असणाऱ्या भाजपप्रणित एनडी सरकारला या निकालातून हादरे बसले आहेत. महाराष्ट्रातला निकालही धक्कादायक लागला आहे. आतापर्यंत मतमोजणीतून आलेल्या निकालानुसार अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसताना दिसतोय. विशेष म्हणजे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला मोठा दणका बसला आहे. महाराष्ट्रात भाजपची मोठी हानी झालेली बघायला मिळत आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाच्या जनतेने मतदानातून सडेतोड उत्तर दिल्याचं बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघावर कोण-कोण जिंकलं, याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी

  • 1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध यामिनी जाधव – शिंदे गट
  • 2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे – शिंदे गट (पराभव) विरुद्ध अनिल देसाई – ठाकरे गट (विजयी)
  • 3) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तिकर – ठाकरे गट ( अवघ्या 48 मतांनी पराभव) विरुद्ध रविंद्र वायकर – शिंदे गट – (विजयी)
  • 4) बुलढाणा – नरेंद्र खेडेकर – ठाकरे गट (पराभव) विरुद्ध प्रतापराव जाधव – शिंदे गट (विजयी)
  • 5) ठाणे – राजन विचारे – ठाकरे (पराभव) विरुद्ध नरेश म्हस्के – शिंदे गट (विजयी)
  • 6) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट (विजयी) विरुद्ध वैशाली दरेकर – ठाकरे गट
  • 7) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध हेमंत गोडसे – शिंदे गट
  • 8) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे – ठाकरे गट विरुद्ध इम्तियाज जलील – एमआयएम विरुद्ध संदीपान भुमरे – शिंदे गट (विजयी)
  • 9) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट विरुद्ध बाबूराव कदम – शिंदे गट – निकाल येणे बाकी आहे
  • 10) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध राजश्री पाटील – शिंदे गट
  • 11) हातकणंगले – सत्यजीत पाटील – ठाकरे गट विरुद्ध धैर्यशील माने – शिंदे गट (विजयी)
  • 12) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट (विजयी) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील – ठाकरे गट
  • 13) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध सदााशिव लोखंडे – शिंदे गट
  • 14) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट (विजयी), सुनेत्रा पवार – राष्ट्रवादी
  • 15) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट (विजयी), शिवाजी आढळराव – राष्ट्रवादी
  • 16) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप (विजयी) विरुद्ध भूषण पाटील – काँग्रेस
  • 17) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस (विजयी) विरुद्ध उज्वल निकम – भाजप
  • 18) नंदुरबार – डॉ. हिना गावित – भाजप (पराभव) विरुद्ध गोपाल पाडवी – काँग्रेस (विजयी)
  • 19) धुळे – सुभाष भामरे – भाजप (पराभव) विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव – काँग्रेस (विजयी)
  • 20) जालना – रावसाहेब दानवे – भाजप (पराभव) विरुद्ध डॉ. कल्याण काळे – काँग्रेस (विजयी)
  • 21) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस विरुद्ध सुधाकर श्रृंगारे – भाजप – निकाल येणे बाकी
  • 22) नांदेड – प्रताप चिखलीकर – भाजप (पराभव) विरुद्ध वसंतराव चव्हाण – काँग्रेस (विजयी)
  • 23) अकोला – अनुप धोत्रे – भाजप विरुद्ध अभय पाटील – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)
  • 24) अमरावती – नवनीत राणा – भाजप (पराभव) विरुद्ध बळवंत वानखेडे – काँग्रेस (विजयी)
  • 25) नागपूर – नितीन गडकरी – भाजप (विजयी) विरुद्ध विकास ठाकरे – काँग्रेस
  • 26) भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे – भाजप विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)
  • 27) गडचिरोली – अशोक नेते – भाजप विरुद्ध डॉ. नामदेव किरसान – काँग्रेस (विजयी)
  • 28) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस (विजयी) विरुद्ध सुधीर मुनगंटीवार – भाजप
  • 29) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप (विजयी) विरुद्ध रविंद्र धंगेकर – काँग्रेस
  • 30) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस (विजयी) विरुद्ध राम सातपुते – भाजप
  • 31) भिवंडी – कपिल पाटील – भाजप (पराभव) विरुद्ध सुरेश म्हात्रे – शरद पवार गट (विजयी)
  • 32) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार (विजयी) विरुद्ध डॉ. भारती पवार – भाजप
  • 33) रावेर – रक्षा खडसे – भाजप (विजयी) विरुद्ध श्रीराम पाटील – शरद पवार गट
  • 34) बीड – पंकजा मुंडे – भाजप विरुद्ध बजरंग सोनवणे – शरद पवार गट – निकाल येणे बाकी
  • 35) वर्धा – रामदास तडस – भाजप विरुद्ध अमर काळे – पवार गट (विजयी)
  • 36) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट (विजयी) विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर – भाजप
  • 37) सातारा – शशिकांत शिंदे – शरद पवार गट (पराभव) विरुद्ध उदयनराजे भोसले – भाजप (विजयी)
  • 38) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट (विजयी), सुजय विखे पाटील – भाजप
  • 39) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध मिहीर कोटेचा – भाजप
  • 40) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप (विजयी) विरुद्ध भारती कामडी – ठाकरे
  • 41) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप (विजयी) विरुद्ध विनायक राऊत – ठाकरे गट
  • 42) जळगाव – स्मिता वाघ – भाजप (विजयी) विरुद्ध करण पवार – ठाकरे गट
  • 43) सांगली – संजयकाका पाटील – भाजप विरुद्ध चंद्रहार पाटील – ठाकरे विरुद्ध अपक्ष विशाल पाटील (विजयी)
  • 44) रायगड – अनंत गीते – ठाकरे (पराभव) विरुद्ध सुनील तटकरे – राष्ट्रवादी (विजयी)
  • 45) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे (विजयी) विरुद्ध अर्चना पाटील – राष्ट्रवादी
  • 46) परभणी – संजय जाधव – ठाकरे (विजयी) विरुद्ध महादेव जानकर – राष्ट्रवादी
  • 47) रामटेक – राजू पारवे – शिवसेना विरुद्ध श्यामकुमार बर्वे – काँग्रेस (विजयी)
  • 48) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस (विजयी), संजय मंडलिक – शिवेसना

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;