काँग्रेस पक्षाचं नेतृत्व ‘हा’ तरूण नेता करणार?; राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग
लोकसबभा निवडणुकीचा निकाल लागतो आहे. अशात विविध घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षाच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कोण करणार याबाबत आता निर्णय घेतला जात आहे. राहुल गांधींना लोकसभेत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसमधील सुत्रांनी दिली आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय राहुल गांधीच घेणार असल्याची माहिती आहे. लवकरच दिल्लीत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक बोलावण्यात येणार आहे. याच बैठकीत नव्या नेत्याची निवड करण्यात येणार आहे. सध्या अधीर रंजन चौधरी यांच्याकडे हे पद आहे.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List