Thane Lok Sabha constituency Election Leading Result 2024 : शिंदेचा गड राखला, नरेश म्हस्केंची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू
लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर निकाल समोर आले आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा गड राखण्यात यश मिळाल्याचं चित्र दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांचा खास माणूस म्हणून ओळख असलेल्या नरेश म्हस्के हे आघाडीवर असून त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार विचारे यांना मोठ्या फरकाने पिछाडीवर टाकून ते आघाडीवर आहेत. शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जास्त महत्त्वाची ठरली. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. हा गड राखण्यात शिंदेच्या शिवसेनेला यश मिळाल्याचं चित्र दिसत आहे.
शिवसेना फुटली तेव्हा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा राजन विचारे यांना संधी दिली. तर दुसरीकडे हायुतीकडून ठाण्याची जागा ही शिंदे गटासाठी सुटली. शिंदे गटाने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी लढत ठाण्यात बघायला मिळाली. या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज समोर आला आणि शिंदेंचा खास माणूस नरेश म्हस्के यांनी विजय मिळवत पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.
ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. असं असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा राजन विचारे यांना संधी दिली. तर दुसरीकडे महायुतीकडून ठाण्याची जागा ही शिंदे गटासाठी सुटली. शिंदे गटाने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी लढत ठाण्यात बघायला मिळाली. या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार सध्या ठाण्यात ठाकरे गटाचे राजन विचारे आघाडीवर आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय ?
1984 मध्ये काँग्रेसचे शांताराम घोलप येथून खासदार झाले. भाजपचे राम कापसे 1989 आणि 1991 मध्ये दोनदा निवडून आले. 1996 नंतर ही जागा सलग 4 वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांच्या ताब्यात राहिली. त्यांच्या निधनानंतर 2008 मध्ये येथे पोटनिवडणूक झाली ज्यात त्यांचे पुत्र आनंद परांजपे विजयी झाले. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नायक विजयी झाले होते. मोदी लाटेत ही जागा भाजप-शिवसेना युतीकडे गेली. शिवसेनेचे राजन विचारे 2014 आणि 2019 मध्ये येथून खासदार म्हणून निवडून आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List