बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासमोर बजरंग सोनवणे यांचे मोठे आव्हान; प्रत्येक फेरीत वाढली चुरस

बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासमोर बजरंग सोनवणे यांचे मोठे आव्हान; प्रत्येक फेरीत वाढली चुरस

बीडच्या राजकारणाला जातीय रंग चढल्यानंतर राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे गेले. आतापर्यंत मुंडे घरातील वाद चर्चेच्या केंद्रस्थानी होता. पण यावेळी जातीय समीकरणाने आकड्यांवर परिणाम केल्याचे दिसून येते. बीडमध्ये मतदान प्रक्रियेतील गडबडीबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग आप्पा सोनवणे यांनी आरोपांच्या फैरी उडवून दिल्या. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका आणि त्यांचा रोख याच्यावर तोंडसूख घेतले होते. तर मतमोजणी प्रक्रियेवर पण प्रश्नचिन्ह उभं केले होते. त्यानंतर हाती येत असलेल्या आकेडवारीत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केल्याचे दिसून येते.

पहिल्या फेरीपासून टशन

बीड लोकसभेची निवडणूक सुरुवातीपासून चुरशीची झाली. अटीतटीच्या या लढतीत दोन्ही उमेदवारांमध्ये अगदी काँटे की टक्कर सुरु आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली होती. पाचव्या फेरी अखेर तर त्यांनी मोठी झेप घेतली. त्यांनी 8 हजारांपेक्षा अधिकची लीड घेतली होती. पण पंकजा मुंडे यांनी ही लीड कापत आणली. आता दोन्ही उमेदवारांमध्ये दोन हजारांचे मतांचे अंतर दिसत आहे. पंकजा मुंडे यांनी मोठे अंतर कापत आणले आहे. पण पंकजा मुंडे यांना ही लीड कायम ठेवता येईल का? अशी पण चर्चा रंगली आहे. तर काहींनी बजरंग बाणाकडे महायुतीने गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप पण करण्यात येत आहे.

41 उमेदवारांची भाऊगर्दी

बीड लोकसभेसाठी यंदा 41 उमेदवार उभे होते. महायुतीचे पंकजा मुंडे तर महविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होणार हे नक्की होते. त्यात वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांनी पण चुरस निर्माण केली होती. पण यावेळी पहिल्यांदाच या लोकसभा मतदारसंघात जातीचा मुद्दा समोर आला आणि निवडणुकीनंतर मोठा गोंधळ झाला. अनेक गावांत दोन समाज एकमेकांसमोर आल्याचे दिसून आले. तरीही काही तालुक्यात दोन्ही समाजाने समंजस्याची भूमिका दाखवली. त्याआधारे कार्यकर्ते आता कोणता तालुका लीड मिळवून देईल याची समीकरणं मांडत आहे.

सध्या काय स्थिती

सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप उमेदवार आणि नेत्या पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत. त्यांना सध्या 250 मतांची आघाडी आहे. पंकजा मुंडे यांना 1,23,135 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांना 1,22,886 मते मिळाली आहेत. दोघांमध्ये अगदी अटीतटीचा सामाना सुरु आहे. दोघांमध्ये केवळ 250 मतांचा फरक दिसून येत आहे. अशोक हिंगे यांना मोठी बाजी मारता आलेली नाही. त्यांना 7,795 मते मिळाली आहेत. आता दुपारचे तीन वाजायला उणा-पुरा एक तास उरला आहे. त्यानंतर कोण आघाडी मारणार हे चित्र स्पष्ट होईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;