इंडिया आघाडीने असा पलटला खेळ; 2019 च्या तुलनेत काँग्रेसला लक्षणीय फायदा

इंडिया आघाडीने असा पलटला खेळ; 2019 च्या तुलनेत काँग्रेसला लक्षणीय फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी साडेतीनशेहून अधिक जागांवर विजय मिळवून तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमधून व्यक्त करण्यात आला होता. सलग दहा वर्षे सत्तेत राहूनही भाजपविरोधी वातावरण नसल्याचा आणि विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचा फारसा प्रभाव निकालांवर पडणार नसल्याचा अंदाज या चाचण्यांमधून व्यक्त झाला होता. मात्र निवडणूक निकालाचे सुरुवातीचे आकडे पाहता 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ‘इंडिया’ आघाडी आणि विशेषत: काँग्रेससाठी लक्षणीय फायदा होणार असल्याचं दिसतंय. सकाळी 11 वाजेपर्यंत एनडीए 291 जागांवर आणि इंडिया आघाडी 226 जागांवर पुढे होती. 2019 मध्ये केवळ 52 जागा जिंकणारी काँग्रेस आता 98 लोकसभा मतदारसंघात आघाडीवर आहे.

मागच्या निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकून 272 चा टप्पा आरामात ओलांडून जबरदस्त विजय मिळवला होता. या पक्षाला एकूण मतांपैकी 37.36 टक्के मतं मिळाली होती. तर दुसरीकडे काँग्रेसला एकूण मतांपैकी 19.5 टक्के मतं मिळाली होती. आता सकाळी 11 वाजेपर्यंत समोर आलेल्या सुरुवातीच्या कलांनुसार, एनडीएला एकूण मतदानापैकी 44 टक्के आणि इंडिया आघाडीला 41 टक्के मतं मिळाली आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा स्ट्राइक रेट 54 टक्के होता, तर इंडिया आघाडीचा स्ट्राइक रेट 42 टक्के होता.

Lok Sabha Election Results 2024 Leading & Trailing LIVE : स्मृती इराणी किती हजार मतांनी पिछाडीवर?

उत्तर प्रदेशात विरोधी पक्षांच्या आघाडीची स्थिती सकारात्मक दिसून येत आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार काँग्रेस-समाजवादी पक्ष 42 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 37 जागांवर आघाडीवर आहे. 2019 मध्ये भाजपने उत्तर प्रदेशमध्ये मोठा विजय मिळवला होता. भाजपने त्यावेळी 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. तर अपना दलने दोन जागा जिंकल्या होत्या. समाजवादी पक्षाला केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसने फक्त एकाच जागेवर विजय मिळवला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;