Loksabha Election Result: उत्तर प्रदेशात राम मंदिराचा मुद्दा चालला नाही, भाजपला जोरदार धक्का

Loksabha Election Result: उत्तर प्रदेशात राम मंदिराचा मुद्दा चालला नाही, भाजपला जोरदार धक्का

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहे. गेल्या दोन निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवणाऱ्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. भाजपचा 400+ चा नारा आणि सर्व एग्झिट पोलचे दावे फोल ठरत आहे. इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीए सत्तेपर्यंत पोहचत असला तरी 2024 लोकसभा निवडणुकामध्ये चांगला फटका बसला आहे. भाजपला सर्वाधिक धक्का हक्काच्या असलेल्या उत्तर प्रदेशात बसला आहे. उत्तर प्रदेशात राम मंदिराचा मुद्दा चालला नाही. नरेंद्र मोदी सरकारचे सात मंत्री पिछाडीवर आले. २०१४ मध्ये ७१ तर २०१९ मध्ये ६२ जागा उत्तर प्रदेशात भाजपला मिळाल्या होत्या. परंतु आता ३४ जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात सात मंत्री पिछाडीवर

उत्तर प्रदेशात समाजावादी पार्टीने जोरदार आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्ष ३५ जागांवर पुढे आहे. काँग्रेस सात जागांवर आघाडीवर आहे. भाजपचे मंत्री संजीव बालियान, स्मृती ईरानी, साध्वी निरंजन ज्योती, कौशल किशोर, अजय मिश्र टेनी, अनुप्रिया पटेल आणि महेंद्रनाथ पिछाडीवर आहेत.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारची कामगिरी जोरदार राहिली. उत्तर प्रदेशातील माफिया गिरी त्यांनी मोडून काढली. त्या भव्य राम मंदिर पूर्ण झाले. परंतु भाजपला स्वबळावर सत्तेपर्यंत जाण्यापासून उत्तर प्रदेशने रोखले आहे. उत्तर प्रदेशाचा निकालाने सर्व एग्झिट पोल फेल ठरवले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली  या दोन्ही जागांवर पुढे आहेत.

बंगालमध्ये भाजपला धक्का

उत्तर प्रदेशप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का बसला आहे. या ठिकाणी ममता बॅनर्जी यांची जादू कायम राहिली आहे. सर्व एग्झिट पोलने बंगालमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु हा अंदाज फोल ठरला आहे. बंगालमध्ये भाजपला 26 ते 31 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु प्रत्यक्षात भाजपला फक्त दहा जागा मिळताना दिसत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;