जालन्यात एक्झिट पोलला ‘चकवा’? की रावसाहेब दानवे ठोकणार षटकार

जालन्यात एक्झिट पोलला ‘चकवा’? की रावसाहेब दानवे ठोकणार षटकार

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत षटकार ठोकण्याची मोठी संधी भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांना आहे. आपल्या रांगड्या भाषणांसाठी ते ओळखले जातात. तळगाळात त्यांचे मोठे नेटवर्क आहे. पण मराठा आरक्षणाची चळवळ गेल्यावर्षी जालन्यातून मोठ्या उमेदीने आणि ताकदीने पुढे आली. जालना हे मराठा आरक्षणाच्या केंद्रस्थानी आले. तेव्हापासून लोकसभेच्या निवडणुकीची हवा पालटल्याचे बोलले जाते. अर्थात विद्यमान खासदार दानवे हे विरोधकांना चकवा देण्यात माहीर असल्याचे दिसून आले आहे. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर कल्याण काळे यांनी त्यांना कडवे आव्हान दिले होते. त्यामुळे जनता कुणाच्या बाजूने कौल देते हे लवकरच पुढे येईल. सध्या डॉ. काळे यांनी दानवे यांच्याविरोधात आघाडी घेतल्याचे दिसून येते.

एक्झिट पोलला ‘चकवा’

एक्झिट पोलच्या आकड्यांनी अर्थातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात तराजूत झुकते माप टाकले आहे. पण मराठा आरक्षणाचे समीकरण गणित बिघडवू शकते, असा एक मत प्रवाह पण आहे. या मतदारसंघात 13 मे रोजी मतदान झाले होते. तेव्हापासून मतदार एक्झिट पोलला चकवा देतील अशी चर्चा रंगली आहे. आता मतमोजणीत कल्याण काळे 2683 मतांनी आघाडीवर आले आहेत. तर रावसाहेब दानवे आणखी पिछाडीवर गेले आहेत. अर्थात सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यावर आणि मतमोजणी संपल्यावर कोण कोणाला चकवा देते हे समोर येईल.

दानवे षटकार ठोकतील?

रावसाहेब दानवे हे महाराष्ट्रातील भाजपचा जुना चेहरा आहे. अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपासून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. बुथनिहाय मजबूत यंत्रणा आहे. 1980 मध्ये ते पंचायत समिती सभापती झाले. तेव्हापासून त्यांच्या विजयाचे घोडे एक एक निवडणुका जिंकत गेले. 1999 साली त्यंनी पहिल्यांदा भाजपकडून खासदारकी लढवली आणि जिंकली. 2004, 2009, 2024 आणि 2019 असे सलग पाच वेळा ते निवडून आले. आता षटकार ठोकण्याची त्यांची तयारी आहे.

डॉक्टरांचे तगडे आव्हान

डॉ. कल्याण काळे यांनी काँग्रेसमध्ये मोठी दीर्घ खेळी खेळली आहे. गेल्या लोकसभेला त्यांनी जालना मतदारसंघातून दानवे यांना तगडे आव्हान दिले होते. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री या विधानसभा क्षेत्रात डॉक्टरांचा विशेष प्रभाव आहे, हा भाग जालना मतदारसंघात येतो. तर सिल्लोड, पैठण हे पण क्षेत्र जालन्यात मोडतात. यंदा महाविकास आघाडीने जालन्यात सुरुंग लावण्यासाठी मोठी मोर्चबांधणी केलेली आहे. अवघ्या काही तासांत जालन्याचा गड कोणी जिंकला हे स्पष्ट होईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;