मतमोजणी सुरु होण्यापूर्वी बड्या अधिकाऱ्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पदावरुन उचलबांगडी

मतमोजणी सुरु होण्यापूर्वी बड्या अधिकाऱ्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पदावरुन उचलबांगडी

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होण्यापूर्वी मोठी कारवाई झाली आहे. निवडणूक आयोगाने खेडच्या प्राताधिकाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. प्रातांधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचा लेटर बॉम्ब त्यांचा अंगलट आला. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
शिरूर लोकसभेच्या मतमोजणीला काही तास उरले असताना निवडणूक आयोगाने खेडचे प्रांताधिकाऱ्यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी पदावरून उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी सारथीचे उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून वर्णी लावण्यात आली आहे.

काय होता जोगेंद्र कट्यारे यांचा लेटर बॉम्ब

खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीत अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांच्या बदलीची मागणी थेट निवडणूक आयोगाकडे त्यांनी केली होती. हे पत्र समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली करण्याऐवजी थेट कट्यारे यांना बडतर्फ केले आहे.

काय केले होते आरोप

प्रातांधिकारी कट्यारे यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. ते राजकीय प्रभावातून काम करत आहेत, असा आरोप केला होता.

कट्यारे यांच्या तक्रार अर्जानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्तांनी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिले होते. त्यानंतर शिरुर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होण्यापूर्वी त्याची सहायक निवडणूक अधिकारीपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव यांच्यात लढत होत आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;