Loksabha Election 2024 Result : मतमोजणी आधीच निकाल लागला; ‘ही’ जागा भाजपने जिंकली

Loksabha Election 2024 Result : मतमोजणी आधीच निकाल लागला; ‘ही’ जागा भाजपने जिंकली

जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र अर्थात भारतात सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरु आहे. आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. काहीच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. ठिक 8 वाजता देशभरातील 543 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अवघ्या देशाचं लक्ष आज लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे असणार आहे. देशात महायुतीचं सरकार की इंडिया आघाडीचं? महाराष्ट्रात काय चित्र असणार? महायुती जिंकणार की महाविकास आघाडी? याची सर्वांमध्येच उत्सुकता आहे. मात्र निवडणुकीच्या मतमोजणीआधी एका जागेचा निकाल मात्र स्पष्ट झाला आहे. या ठिकाणी भाजप विजयी झाली आहे.

कोणता आहे हा मतदारसंघ?

गुजरातमधील सूरत या लोकसभा मतदारसंघाचा निकाल स्पष्ट झाला आहे. सूरत या लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झालेली आहे. गुजरातच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय. सूरतच्या जागेवर पहिल्यांदाच कुणी व्यक्ती बिनविरोध निवडली गेली आहे. विना मतदान घेता मुकेश दलाल हे निवडले गेले आहेत.

बातमी अपडेट होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;