उत्तर मुंबई लोकसभा निकाल 2024 : पीयूष गोयल Vs भूषण पाटील, भाजपासाठी सोपी लढाई का?

उत्तर मुंबई लोकसभा निकाल 2024 : पीयूष गोयल Vs भूषण पाटील, भाजपासाठी सोपी लढाई का?

मुंबई उत्तर हा भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. भाजपाने या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना तिकीट दिलं. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे भूषण पाटील निवडणूक रिंगणात आहेत. भाजपासाठी या मतदारसंघात जमेची बाजू म्हणजे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा तगडा जनसंर्पक नाहीय. मतदारांमध्ये त्यांची ओळख नाहीय. हीच गोष्ट भाजपाच्या पथ्यावर पडणारी आहे. मराठी भाषिक मतदारांपेक्षा या मतदारसंघात अन्य भाषिक मतदारांची संख्या जास्त आहे. मागच्या दोन टर्मपासून भाजपाने या मतदारसंघात आरामात विजय मिळवलाय.

उत्तर मुंबई मतदारसंघात गुजराती, उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने आहेत. मराठी मतदारांपेक्षा त्यांचे प्रमाण जास्त आहे. गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार नेहमीच भाजपाच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यामुळे इथून भाजपा उमेदवाराने आरामात विजय मिळवला. बोरिवली, दहीसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून गोपाळ शेट्टी यांनी घवघवीत यश मिळवलय. एकदा शेट्टी यांनी काँग्रेसच्या उमदेवार उर्मिला मातोंडकर आणि त्याआधी संजय निरुपम यांच्यावर मोठा विजय मिळवला.

उमेदवाराचे नाव आघाडी-पिछाडीनिकाल
पीयूष गोयल (भाजपा)
भूषण पाटील (काँग्रेस)

पाच विधानसभा क्षेत्रात भाजपा-शिवसेनेच वर्चस्व

बोरिवली, दहिसर, कांदिवली पूर्व आणि चारकोप या चार विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. मागाठणेमधून शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत. फक्त मालाड पश्चिमेला काँग्रेसचे अस्लम शेख आमदार आहेत. म्हणजे पाच विधानसभा क्षेत्रात भाजपा-शिवसेनेच वर्चस्व आहे. त्याच कारणामुळे पीयूष गोयल यांचा विजय सोपा मानला जातोय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;