पुणे, बारामती, सातारा, शिरूर, अहमदनगर, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल LIVE Counting and Winner Updates
लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे जगाचंही लक्ष लागलेलं असणार आहे. एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचं अंदाज वर्तवला गेलाय. मात्र महाराष्ट्रात वारं फिरताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला असून पोलमध्येही दिसून आलं. मात्र आज निकालामध्ये सर्व काही स्पष्ट होणार असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात हाय व्होल्टेज लढत बारामती मतदारसंघात आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार की विद्यमान खासदार सुप्रिया सुळे? बारामतीकरांनी पसंती कोणाला? हे स्पष्ट होणार आहे. त्यासोबतच पुण्यात होणाऱ्या तिरंगी लढतीमध्ये रविंद्र धंगेकर की मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे, तर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात लढत झाली होती. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 12 लोकसभा मतदार संघ असून त्यामधील सात लढतींकडे विशेष लक्ष असणार आहे. बारामती, पुणे, मावळ, शिरूर, सांगली, सातारा आणि अहमदनर या जागांवर काँटे की टक्कर पाहायला मिळाली. विजयाचा गुलाल उधळण्याआधी निकालाच्या सर्व अपडेट्स टीव्ही9 मराठीवर पाहा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List