महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE : राज्यात सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान महाराष्ट्रातील ४८ मतदार संघात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान झाले. पाच टप्प्यात झालेल्या या मतदानानंतर राज्यातील जनतेला मतमोजणीचे वेध लागले होते. राज्यातील सर्वच मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना झाला. राज्यातील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून बारामती लोकसभा मतदार संघ ठरली. या ठिकाणी पवार कुटुंबातील शरद पवार आणि अजित पवार यांच्यातच लढत झाली. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात होत्या. आता ४८ मतदार संघात काय लागणार निकाल… त्याची उत्सुक्ता राज्यातील जनतेला आहे. सर्व मतदार संघातील प्रत्येक अपडेट वाचा…
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List