नाशिक लोकसभा निकाल 2024 : शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे

नाशिक लोकसभा निकाल 2024 : शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे

नाशिक : मुंबईची परसबाग, कुंभ नगरी, वाईन कॅपिटल मंदिरांचे शहर, तपोभूमी, द्राक्ष पंढरी अशी विविध ओळख असलेल्या नाशिकचा खासदार ( Nashik Constituency MP ) होण्यासाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godase Candidate of Shinde Group ), ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे ( Rajabhau Waje Candidate of Thackeray Group ) आणि शांतिगिरी महाराज ( Shantigiri Maharaj indipendant Candidate ) असे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, अपेक्षेनुसार शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात झालेल्या प्रमुख लढत झाली.

नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटाकडून पुन्हा एकदा लोकसभा लढविली. त्यांना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी आव्हान दिले होते. जय बाबाजी भक्त परिवारातील जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज यांनीही लोकसभेची तयारी सुरु केल्याने या लढतीत चुरस निर्माण झाली होती.

अयोध्येतील रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने तपोभूमी असलेल्या धार्मिक नाशिकला राजकीय दृष्ट्या अधिक महत्त्व प्राप्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही नाशिकमधील काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेतले होते.

नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे येथे मनसे उमेदवार देण्याची शक्यता असतानाच राज ठाकरे यांनी भाजपला मतदान करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नाशिकमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार असल्याने ही निर्णायक मते कुणाच्या बाजूने जाणार याची उत्सुकता होती.

कोण आहेत राजाभाऊ वाजे ?

राजाभाऊ वाजे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात. सिन्नर विधानसभा मतदारसंघातील सुमारे दीड लाख मते राजाभाऊंकडे आहेत. यासोबतच इगतपुरी ग्रामीण भागात त्यांचा अधिक संपर्क आहे. संयमी शांत नेता आणि मराठा चेहरा अशी त्यांची ओळख आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे पहिल्यांदा आमदार झाले होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये चौरंगी लढत झाली होती. वंचितचे उमेदवार पवन पवार यांनी 1 लाखाहून अधिक मते घेतली होती. पण, हेमंत गोडसे यांनी 5 लाख 63 हजार 599 इतकी सर्वाधिक मते घेऊन विजय मिळविला. राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा त्यांनी पराभव केला होता. समीर भुजबळ यांना 2 लाख 71 हजार 395 मते मिळाली होती. तर, राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी 1 लाख 34 हजार 527 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती.

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीतील पहिले तीन उमेदवार म्हणजेच हेमंत गोडसे, समीर भुजबळ आणि माणिकराव कोकाटे हे महायुतीच्या माध्यमातून एकत्र आले. तर, शिवसेना (ठाकरे गट) यांची पारंपारिक मते याशिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीची मते यावर ठाकरे गटाचे भवितव्य अवलंबून होते.

सहा विधानसभांपैकी पाच विधानसभा सत्ताधारी पक्षाकडे

नाशिकमधील सहा विधानसभांपैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे सत्ताधारी पक्षाकडे आहेत. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य हे तीन शहरातील मतदारसंघ भाजपकडे आहेत. तर देवळाली, सिन्नर हे मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहेत. उर्वरित इगतपुरी या एकाच मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;