वाराणसी लोकसभा निकाल 2024: नरेंद्र मोदी VS काँग्रेसचे अजय राय

वाराणसी लोकसभा निकाल 2024: नरेंद्र मोदी VS काँग्रेसचे अजय राय

देशातील सर्वात हॉट सीटवरील लढतीकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (bjp candidate narendra modi) यांच्या वाराणसी मतदार संघात काय होणार? याकडे राजकीय विश्लेषकांची नजर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणावरुन तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुख अजय राय (congress candidate ajay rai) आणि बसपा नेते अथर जमाल लारी होते. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी सामना झाला.

वाराणसी लोकसभा मतदार संघाचा इतिहास (Varanasi Lok Sabha Seat Winner History)

स्वतंत्र्यानंतर रघुनाथ सिंह तीन वेळा या ठिकाणावरुन खासदार झाले. 1967 मध्ये सीपीएमचे एस. एन.सिंह यांनी त्यांना पराभूत केले. 1971 मध्ये काँग्रेसने विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु प्रो. राजाराम शास्त्री यांनी निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांनी जनसंघचे कमला प्रसाद सिंह यांना पराभूत केले. 1977 मध्ये जेपी लहरमध्ये लोकदलचे चंद्रशेखर खासदार झाले. 1980 मध्ये काँग्रेसचे पंडीत कमलापती त्रिपाठी यांनी राजनारायण यांना पराभूत केले. 1984 मध्ये काँग्रेसचे श्यामलाल यादव, 1989 मध्ये व्ही.पी. सिंह लहरमध्ये जनता दलाचे अनिल शास्त्री विजयी झाले.

1991 मध्ये असा बदल

1991 प्रथम राम मंदिराचे नायक श्रीशचंद दीक्षित यांनी या मतदार संघात प्रथम भगवा फडकवला. त्यानंतर तीन वेळा भाजपचे शंकर प्रसाद जायसवाल खासदार राहिले. 2004 मध्ये डॉ. राजेश मिश्रा यांनी त्यांना पराभूत केली. 2009 मध्ये भाजपने डॉ. मुरली मनोहर जोशी यांना उतरवले. ते विजयी झाले. त्यानंतर 2014 व 2019 मध्ये नरेंद्र मोदी विजयी झाले.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;