नागपूर लोकसभा निकाल 2024 : नितीन गडकरी की विकास ठाकरे? नागपूरच्या लढतीकडे देशाचे लक्ष

नागपूर लोकसभा निकाल 2024 : नितीन गडकरी की विकास ठाकरे? नागपूरच्या लढतीकडे देशाचे लक्ष

संत्रानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर मतदारसंघाकडे ( Nagpur Lok Sabha Constituency ) देशाचे लक्ष लागले आहे. भाजपचे हेवीवेट नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Candidate of BJP Nitin Gadkari ) हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसने शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे ( Candidate of Congress Vikas Thackeray ) यांना उतरविले आहे. पूर्वी हा मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात होता. पण, 2014 च्या मोदी लाटेत गडकरी पहिल्यांदा येथून निवडून आले. तर, 2019 च्या निवडणुकीत गडकरी यांनी काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांचा 2 लाख 16 हजार 009 मतांनी पराभव केला होता.

कोण आहेत विकास ठाकरे ?

नितीन गडकरी यांच्या विरोधात कॉंग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली. विकास ठाकरे हे पश्चिम नागपुर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2002 च्या महापालिका निवडणुकीत ते विजयी झाले आणि पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्याकडे नागपूरचे महापौरपद चालून आले. तर, 2007 मध्ये ते विरोधी पक्षनेते होते. 2009 मध्ये त्यांनी दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात विधानसभा निवडणुक लढविली. पण, त्यांचा पराभव झाला. गेल्या दहा वर्षांपासून आ. ठाकरे हे नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

नागपूरात किती टक्के मतदान झाले?

नागपुरमध्ये एकूण 54.33 टक्के मतदान झाले. नागपूर लोकसभा मतदारसंघात 22 लाख 23 हजार 281 मतदार आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 12 लाख 07 हजार 344 जणांनी मतदान केले होते. घातलेल्या मतदानाचा नेमका फायदा कुणाला झाला हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;