दक्षिण मुंबई लोकसभा निकाल 2024 : ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ( South Mumbai loksabha Constituency ) ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत ( Arvind Sawant candidate of Shivsena Thackeray Group ) यांच्याविरोधात भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी जाधव ( Yamnini Jadhav candidate of Shivsena Shinde Group ) यांच्यात लढत होत आहे. दक्षिण मुंबईमध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झाले होते.
2014 च्या आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे मिलिंद मुरली देवरा यांचा पराभव केला होता. 2019 च्या निवडणूक जिंकल्यानंतर अरविंद सावंत यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत मतभेद झाले. त्यामुळे अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेनेचे 13 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. परंतु, अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली.
2024 च्या निवडणुकीत अरविंद सावंत यांच्याविरोधात शिंदे गटात प्रवेश केलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, त्यांना राज्यसभेची संधी देण्यात आल्याने शिंदे गटाने येथून भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली. दक्षिण मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीकडे 3 आणि महाविकास आघाडीकडे 3 असे समसमान संख्याबळ आहे.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List