कल्याण लोकसभा निकाल 2024 : कल्याणात कोण बाजी मारणार, ठाकरे की शिंदे गट ? श्रीकांत शिंदे पुन्हा संसदेत दिसणार ?

कल्याण लोकसभा निकाल 2024 : कल्याणात कोण बाजी मारणार, ठाकरे की शिंदे गट ? श्रीकांत शिंदे पुन्हा संसदेत दिसणार  ?

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामतीकडे लागलं होतं. तिथे पवार वि. पवार असा सामना रंगला.त्याचप्रमाणे आणखी एका मतदारसंघानेही या निवडणुकीत लक्ष वेधून घेतलं तो म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ. महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत असली तरी खरी लढत ठाकरे गट वि. शिंदे गट अशीच आहे. महाविकास आघाडीमध्ये कल्याणची ही जागा ठाकरे गटाकडे आली आणि त्यांनी वैशाली दरेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. तर महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला मिळाली. कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मुख्यमंत्र्यांचा गड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा श्रीकांत शिंदे यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ठाकरे वि शिंदे असा हा सामना असून दोघांसाठीही ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. आज मतमोजणीला सुरूवात झाल्यापासूनच आता ही जागा कोण जिंकतय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कल्याणचं दोनदा प्रतिनिधित्व करणारे श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा बाजी मारून पुन्हा संसदेत दिसतात की शिवसेनेच्या वैशाली दरेकर त्यांना धक्का देत बाजी पलटवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मुख्यमंत्र्यांचा गड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार प्रत्येक वेळी खासदार म्हणून निवडून येतो. मात्र आता शिवसेनेतच दोन गट झाले आहेत. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. यासाठी दोन्ही उमेदवारांनी कसून प्रचार केला. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर उतरून जोरदार प्रचार केल्याचे दिसून आले.

कल्याण लोकसभा मतदार संघाचा इतिहास

कल्याण लोकसभा मतदार संघासाठी 20 मे रोजी मतदान झाले. कल्याण लोकसभा मतदारसंघात केवळ 50.12 टक्के मतदान झाले होते. कल्याणमध्ये 2014 साली 42.88 टक्के तर 2019 साली 44.21 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी बाळाराम पाटील यांचा 3,44,343 मतांनी पराभव केला. श्रीकांत शिंदे यांना 5,59,723 मते मिळाली होती.

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेली १० वर्ष कल्याण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असले तरीही या मतदारसंघातील अनेक प्रश्न अद्याप कायम आहेत. शीळफाटा येथे होणारी वाहतूक कोंडी हा एक कळीचा, महत्वाचा मुद्दा आहे. तसेच रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. दोनदा खासदार राहिलेले श्रीकांत शिंदे यांना ही निवडणूक कशी जाते, तिसऱ्यांदा ते बाजी मारून संसदेत जातात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर शिवसेना ठाकरे गटातर्फे वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यापासूनच ही लढाई चुरशीची झाली आहे. ‘गद्दारांना एक महिला धडा शिकवेल’ हा ठाकरे गटाचा या निवडणुकीत प्रचार दरेकर यांनी सुरू ठेवला. कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे, वैशाली दरेकर यांच्यासह 28 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;