अमरावती लोकसभा निकाल 2024 : भाजपच्या नवनीत राणा की कॉंग्रेसचे बळवंत वानखेडे?

अमरावती लोकसभा निकाल 2024 : भाजपच्या नवनीत राणा की कॉंग्रेसचे बळवंत वानखेडे?

अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha Constituency) निवडणूकीमध्ये यावेळी विद्यमान खासदार नवनीत राणा ( Candidate of BJP Navneet Rana ) या भाजपकडून लढत आहे. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे बळवंत वानखेडे ( Candidate of Congress Balwant Wankhede ) आणि प्रहार संघटनेचे दिनेश बुब ( Candidate of Prahaar Dinesh Bub ) हे ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे अमरावतीमध्ये तिरंगी लढत होत आहे. अमरावती लोकसभा निवडणूक गेल्या दोन महिन्यापासून चर्चेत राहिली. याचे कारण म्हणजे विद्यमान खासदार नवनीत राणा आणि शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ याच्यात झालेले मतभेद. यातच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही नवनीत राणा यांच्याविरोधात आघाडी उघडून आपला उमेदवार देण्याचे जाहीर केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात झालेल्या जागावाटपाच्या चर्चेमध्ये ही जागा अखेर भाजपला देण्यात आली. भाजपने येथून पूर्वी राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर खासदार झालेल्या नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली. तर कॉंग्रेसनेही दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे (Balwant Wankhede) यांना उमेदवारी देऊन या निवडणुकीत रंगत आणली.

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे उमेदवार दिनेश बुब हे ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा कॉंग्रेसला गेली. त्यामुळे बूब यांनी प्रहार संघटनेमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.

अमरावतीमध्ये राजकीय परिस्थिती काय?

अमरावती लोकसभा मतदारसंघात 63.67 टक्के मतदान झाले. या लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी बडनेरा (रवी राणा, अपक्ष), कॉंग्रेसच्या सुलभा खोडके (अमरावती), यशोमती ठाकूर (तिवसा), बळवंत वानखडे (दर्यापूर), प्रहारचे बच्चू कडू (अचलपूर) आणि राजकुमार पटेल ( मेळघाट) असे आमदार आहेत.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;