शिरुर लोकसभा निकाल 2024: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, शिवाजीराव आढळराव-पाटील…अमोल कोल्हे
पुणे जिल्ह्यातील शिरुल लोकसभा मतदार संघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण तसे पहिले तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच या ठिकाणी लढत आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (ncp shivajirao adhalrao patil) रिंगणात आहे. परंतु आढळराव पाटील शिवसेनेकडून न लढता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढत आहे. त्यासाठी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळे शिरुरमध्ये अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील अशी दुरंगीच लढत झाली.
शिरूर लोकसभा मतदार संघ पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड भाग येतो. यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, भोसरी आणि हडपसर आदी विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. 2019 मध्ये अमोल कोल्हे विजयी झाले होते. त्यांना 6,35,830 मते मिळाली होती तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना 5,77,347 मते मिळाली होती. 2014 मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील 6,43,415 मते घेऊन विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी दत्तात्रय निकम यांना पराभूत केले होते. निकम यांना 3,41,601 मते मिळाली होती.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List