मेरठ लोकसभा निकाल 2024 : मेरठमध्ये ‘राम आएंगे’? कोण जिंकणर बाजी?

मेरठ लोकसभा निकाल 2024 : मेरठमध्ये ‘राम आएंगे’? कोण जिंकणर बाजी?

मेरठ लोकसभा मतदारसंघातून (Meerut lok sabha election 2024 )कोण बाजी मारणार हे 4 जूनला निकाल जाहीर झाल्यानंतरच ठरेल. भाजपकडून अरुण गोविल, सपाकडून सुनीता वर्मा, बसपकडून देवव्रत कुमार त्यागी हे उमेदवार (Meerut lok sabha candidate) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मेरठ लोकसभा मतदारसंघ हा उत्तर प्रदेश राज्यातील 80 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. मेरठचा सराफा व्यवसाय हा आशियातील नंबर 1 व्यापारी बाजार आहे. सध्या सर्वाचं लक्ष निकालाकडे लागलं आहे.

सांगायचं झालं तर, 2011 च्या आकडेवारीनुसार, मेरठची लोकसंख्या सुमारे 35 लाख आहे, त्यापैकी 65 टक्के हिंदू आणि 36 टक्के जनता मुस्लिम आहेत. मेरठमधील एकूण मतदारांची संख्या 1964388 आहे, त्यापैकी 55.09 टक्के पुरुष आणि 44.91 टक्के महिला मतदार आहेत. याठिकाणी 2014 मध्ये येथील मतदानाची टक्केवारी 63.12 टक्के होती.

2019 मधील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2019)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राजेंद्र अग्रवाल यांनी बाजी मारली होती. त्यांना 5,86,184 मते मिळाली होती. बसपाचे हाजी याकूब कुरेशी 5,81,455 मतांनी दुसऱ्या स्थानावर होते. तर काँग्रेसचे हरेंद्र अग्रवाल 34,479 मतांसह तिसऱ्या स्थानावर होते.

2014 मधील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2019)

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात जोरदार मुसंडी मारली होती. याची सुरुवात मेरठपासूनच झाली. मेरठमध्ये भारतीय जनता पक्षाला सुमारे 48 टक्के मतं मिळाली होती. राजेंद्र अग्रवाल यांनी भाजपकडून निवडणुक लढवली होती. तेव्हा त्यांच्या विरोधात बॉलिवूड अभिनेत्री नगमा निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

राजेंद्र यांनी 5,32,981 इतकी मतं मिळाली होती. तर नगमा काँग्रेसकडून उभ्या होत्या. त्यांना 42,911 मतं मिळाली होती. आता मेरठमध्ये कोणाचं राज्य येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;