अहमदनगर लोकसभा निकाल 2024: भाजप उमेदवार सुजय विखे….., राष्ट्रवादी निलेश लंके

अहमदनगर लोकसभा निकाल 2024: भाजप उमेदवार सुजय विखे….., राष्ट्रवादी निलेश लंके

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मंगळवार मतमोजणी झाली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency) दुरंगी लढत झाली. महायुतीकडून डॉ. सुजय विखे पाटील (BJP Sujay Vikhe Patil) आणि महाविकास आघाडीकडून निलेश लंके (NCP Nilesh Lanke) यांच्यात लढत झाली. निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार होते. परंतु निवडणुकीपूर्वी ते शरद पवार गटात दाखल झाले. त्यानंतर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली. एक खासदार तीन आमदारांसह अहमदनगर मतदार संघावर भाजपचे प्राबल्य आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड मतदार संघ येतात.

अहमदनगर लोकसभा मतदार संघाचा इतिहास (ahmednagar Lok Sabha Seat Winner History)

2009 पासून अहमदनगर मतदार संघात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. 2009 मध्ये भाजपकडून दिलीपकुमार मनसुखलाल गांधी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा दिलीप गांधीच विजयी झाले. त्यांना 605,185 मते मिळाली तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव राजळे यांना 3,96,063 मते मिळाली होती. त्यानंतर 2019 मध्ये भाजपने दिलीप गांधी ऐवजी सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. परंतु त्यानंतर भाजपची विजयाची परंपरा चालू राहिली. सुजय विखे यांनी विक्रमी 704,660 मते घेत विजय मिळवला तर विरोधी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना 4,23,186 मते मिळाली.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;