सांगली लोकसभा निकाल 2024 : संजयकाका पाटील VS चंद्रहार पाटील VS विशाल पाटील, तिरंगी लढतीत कौल कुणाला?

सांगली लोकसभा निकाल 2024 : संजयकाका पाटील VS चंद्रहार पाटील VS विशाल पाटील, तिरंगी लढतीत कौल कुणाला?

सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी चांगलीच चर्चेची ठरली. ही निवडणूक चर्चेत राहण्यामागील कारण म्हणजे महाविकास आघाडीत घडलेल्या घडामोडी. या लोकसभा मतदारसंघाची खरंतर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. तसेच भाजपने देखील चांगली ताकद लावली. त्यामुळे या मतदारसंघात 2014 मध्ये संजय काका पाटील यांचा विजय झाला. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही संजयकाका पाटील यांचा विजय झाला. त्यानंतर यावेळी पुन्हा संजयकाका पाटील हे विजयाची हॅट्रीक मारतात का? हे आज स्पष्ट होत आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत अनपेक्षित घडामोडी घडल्या. काँग्रेसला कोल्हापूरची जागा दिल्यामुळे ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा केला. दुसरीकडे काँग्रेसचा देखील या जागेवर दावा होता. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन चांगलीच रस्सीखेच बघायला मिळाली. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवर अंतिम निर्णय होण्याआधीच ठाकरे गटाने या मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला. ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवार जाहीर केली. यानंतर काँग्रेसमध्ये घडामोडी वाढल्या.

ठाकरे गटाने सांगलीच्या जागेबाबत केलेल्या घोषणेवर सुरुवातीला काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी जाहीर केली. तर सांगलीचे स्थानिक नेते थेट पक्षाच्या दिल्लीच्या हायकमांडपर्यंत गेले. काँग्रेसमधील विशाल पाटील हे सांगलीच्या जागेसाठी आग्रही होते. विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीत जावून पक्षाच्या वरिष्ठांसोबत चर्चा केली. पण ठाकरे गटाचा आग्रह पाहता काँग्रेसच्या वरिष्ठांनी कोल्हापूरच्या मोबदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आल्याचं अधिकृतपणे पक्षाला सांगितलं. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्यावर पक्षशिस्तीचं पालन न केल्याबद्दल कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडल्याचंही बघायला मिळालं.

सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज विधानसभा मतदारसंघ, सांगली विधानसभा मतदारसंघ, पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ, खानापूर विधानसभा मतदारसंघ, तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ, जत विधानसभा मतदारसंघ या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. सांगली लोकसभेत यावेळी 20 उमेदवारांनी आपलं नशिब आजमवलं आहे. पण असं असलं तरी खरी लढत ही महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, महायुतीचे संजयकाका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात ठरली.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;