बारामती लोकसभा निकाल 2024: महायुती उमेदवार सुनेत्रा पवार Vs महाविकास आघाडी उमेदवार सुप्रिया सुळे
पुणे जिल्ह्यातील नवीन तर देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात दुरंगी लढत झाली. पवार कुटुंबामध्ये झालेल्या या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (supriya sule maha vikas aghadi) तर महायुतीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Mahayuti) निवडणूक रिंगणात होत्या. नणंद-भावजय यांच्या या लढतीत प्रचार दरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. बारामती लोकसभा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान झाले होते.
बारामती लोकसभा मतदार संघाचा इतिहास (Baramati Lok Sabha Seat Winner History)
बारामती लोकसभा मतदारसंघाकडे यंदा देशाचे लक्ष होते. आतापर्यंत पवार कुटुंबियांचे वर्चस्व या मतदार संघावर राहिले. 1984 साली शरद पवार यांनी भारतीय काँग्रेस (समाजवादी) पक्षाकडून पहिल्यांदा येथून निवडणूक जिंकली. यापूर्वी या जागेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून 6 वेळा, त्यांची कन्या सुप्रिया सुळे 3 वेळा आणि त्यांचे पुतणे अजित पवार एकदा खासदार झाले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला यांचा समावेश आहे. 2019 च्या निवडणुकीत या जागेवर 21,14,716 मतदार होते. 1957 मध्ये येथे पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे केशवराव जेधे विजयी झाले होते. 1960 च्या पोटनिवडणुकीत आणि 1967 च्या निवडणुकीत काँग्रेसचे गुलाबराव जेधे खासदार म्हणून निवडून आले. 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसचे आर.के.खाडीलकर तर 1977 मध्ये जनता पक्षाचे संभाजीराव काकडे विजयी झाले. 1980 मध्ये काँग्रेसने पुन्हा ही जागा काबीज केली आणि शंकरराव बाजीराव पाटील खासदार झाले.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List