उत्तर मध्य मुंबई 2024 निकाल : उज्वल निकम की वर्षा गायकवाड, कौल कुणाला?

उत्तर मध्य मुंबई 2024 निकाल : उज्वल निकम की वर्षा गायकवाड, कौल कुणाला?

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. कारण या मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यात लढत होत आहे. भाजपने यंदा पुनम महाजन यांचं तिकीट कापत उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवले आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जात होता. कारण येथून सुनिल दत्त हे प्रतिनिधीत्व करत होते. 2014 मध्ये सुनिल दत्त यांची मुलगी प्रिया दत्त यांना येथून पराभव सहन करावा लागला होता.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात यंदा 51.98 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार अशी चर्चा होती. मराठी मतदारांबरोबरच येथे दलीत आणि उत्तर भारतीय मतदारांची मोठी संख्या आहे. मुस्लीम मतदारही या मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावतात. शिवाय उत्तर भारतीय मतदार कोणाच्या पारड्यात मतं टाकणार यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

उज्वल निकम यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी येथे सभा घेतली होती. पण या मतदारसंघात चार लाखांपेक्षा अधिक मुस्लीम मतदार असल्याने विजय कुणाकडे जाणार अशी चर्चा होती. येथे काँग्रेस विरूद्ध भाजप अशी थेट लढत होती.

या मतदारसंघात  विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील दोन भाजपच्या ताब्यात आहेत तर २ शिवसेना शिंदेगटाकडे आहेत. शिवसेना ठाकरेंकडे एक आमदार आहे तर काँग्रेसकडे एक आमदार आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी हे देखील राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे महायुतीचे पारडे जड वाटत होते.

सुनिल दत्त यांच्या निधनानंतर प्रिया दत्त या दोन वेळा येथून विजयी झाल्या होत्या. पण 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. पुनम महाजन यांनी येथून विजय मिळवला. 2019 मध्ये ही पुनम महाजन विजयी झाल्या होत्या.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;