रायगड लोकसभा निकाल 2024 : अनंत गीते वि सुनील तटकरे, रायगडमध्ये कोण बाजी मारणार ?

रायगड लोकसभा निकाल 2024 : अनंत गीते वि सुनील तटकरे, रायगडमध्ये कोण बाजी मारणार ?

लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यात मतदान झाले असून आज थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. काही तासांतच निकाल जाहीर होतील. रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूकही महत्वाची मानली गेली यावेळी मविआतर्फे ही जागा ठाकरे गटाच्या पारड्यात पडली. शिवसेना पक्ष फुटीनंतर मशाल चिन्ह घेऊन लढणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अनंत गीते यांना उमेदावरी दिली. तर त्यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आता त्या दोघांपैकी जनतेने नेमके कोणाच्या बाजूने मतदान केले आहे, ते थोड्याच वेळात स्पष्ट होईल. या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने ही जागा दोनदा काबीज केली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघाचा इतिहास

रायगड लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये कुलाबा लोकसभा मतदारसंघातून वेगळा झाला. या मतदार संघात 2009 मध्ये पहिल्यांदाच निवडणूक झाली. 15 लाख 32 हजारांहून अधिक मतदार असलेली ही जागा शिवसेनेने दोनदा काबीज केली आहे. शिवसेनेने येथे पहिली आणि दुसरी निवडणूक जिंकली होती. रायगड लोकसभा मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे खासदार आहेत. सलग दोनवेळा या मतदारसंघातून खासदार राहिलेले अनंत गीते यांचा त्यांनी पराभव केला होता.

रायगड लोकसभा जागेवर 2009 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत झाली होती. या मतदारसंघामध्ये काँग्रेसने ए. आर. अंतुले तर शिवसेनेने अनंत गीते यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत अनंत गीते यांना 4,13,546 मते मिळाली. त्यांनी ही निवडणूक 1,46,521 मतांनी जिंकली. तर काँग्रेसचे ए.आर. अंतुले यांना 2,67,025 मते मिळाली. 2014 च्या निवडणुकीतही शिवसेनेने अनंत गीते यांना तिकीट देऊन पुन्हा विजयाची पुनरावृत्ती केली.

मात्र 2014 मध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांनी जोरदार टक्कर दिली. अनंत गीते यांचा केवळ 2110 मतांनी विजय झाला. त्यांना 3,96,178 मते मिळाली. तर सुनील तटकरे यांना 3,94,068 तर शेकापचे उमेदवार भाई रमेश कदम यांना 1,29,730 मते मिळाली. 20,362 मतदारांनी NOTA बटण दाबले. पण 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी मागील निवडणुकीचा बदला घेत शिवसेनेच्या अनंत गीते यांचा 31,438 मतांनी पराभव केला. त्यांना 4,86,968 तर गीते यांना 4,55,530 मते मिळाली होती.

रायगड लोकसभा मतदारसंघात 58.10 टक्के मतदान

रायगड लोकसभा मतदारसंघात आधीच्या तुलनेते यंदा यावेळी मतदान घटलं. यावेळी 58.10 टक्के मतदानाची नोंद झाली. 2019 सालच्या तुलनेत हे मतदान 7 टक्के कमी झालं. 2019 ला रायगड लोकसभा मतदार संघात 65.06 टक्के मतदान झालं होते. मात्र यंदा मतदान घटलं असून त्याच फटका कोणाला बसतो, याचीही चर्चा सुरू आहे. यंदा सुनील तटकरे त्यांची विजयी परंपरा कायम राखतात की गीते त्यांना हरवून मागच्या पराभवाचा वचपा काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;