पालघर लोकसभा निकाल 2024 : डॉ. हेमंत सावरा की भारती कामडी, जनतेचा कौल कुणाला
पालघर हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे आणि राज्यातील लोकसभेच्या 48 मतदार संघापैकी एक आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन इतर मतदारसंघात उमेदवार जाहीर झाल्यानंतरही बराच वेळ पालघर मतदारसंघात कोणत्याच पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नव्हता. पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असतील असेट सर्वांना वाटत होते. पण भाजपच्या पारड्यात ही जागा आली आणि डॉ. हेमंत विष्णू सावरा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तर महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाच्या वतीने भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर केली.
त्यानंतर बहुजन विकास आघाडी अर्थात ‘बविआ’ने अगदी शेवटच्या दिवशी राजेश पाटील यांना उमेदवारी दिल्याने येथेही तिरंगी लढत होताना दिसली. आज मतमोजणीनंतर पालघरच्या मतदारांचा कौल कोणाला हे स्पष्ट होईल.
पालघर हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे आणि लोकसभेच्या 48 मतदार संघापैकी एक आहे. 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे दोन तुकडे करून पालघर हा नवा जिल्हा स्थापन झाला. त्यावेळी पालघर हा महाराष्ट्रातील 36 वा नवीन जिल्हा होता. मात्र, याआधी पालघर लोकसभा मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. पालघर लोकसभा मतदार संघात एकूण 20 लाख 89 हजार 750 मतदार आहेत.
2009 मध्ये पहिल्यांदा झाली लोकसभेची निवडणूक
2009 मध्ये येथे पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली. तेव्हा बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव येथे खासदार झाले होते. मात्र 2014 साली ही जागा भाजपकडे गेली आणि चिंतामण वनगा खासदार झाले. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा यांना 5,33,201 तर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला 2,93,681 मते मिळाली होती.
त्यानंतर 2018 मध्ये या जागेवर पोटनिवडणूक झाली आणि भाजपचे राजेंद्र गावित खासदार झाले. यानंतर 2019 मध्ये संपूर्ण देशात पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तेव्हा राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. आता २०२४ च्या निवडणुकीत मतदार कोणाला कौल देतात ? इथे डॉ. हेमंत सावरा विजयी होऊन भाजपाचे कमळ फुलते की भारती कामडी यांच्या विजयनाने शिवसेना उबाठा गटाची मशाल पेटते हे चित्र लौकरच स्पष्ट होईल.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List