बीड लोकसभा मतदारसंघ निकाल : पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे, कौल कुणाला

बीड लोकसभा मतदारसंघ निकाल : पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे, कौल कुणाला

महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात होत्या. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे मैदनात होते तर वंचित बहुजनकडून अशोक हिंगे हे निवडणूक लढवत होते.

बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे या खासदार आहेत. २०१९ मध्ये प्रीतम मुंडे या जागेवरून विजयी होऊन खासदार झाल्या. त्यांना एकूण ६,७८,१७५ मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांना ५,०९,८०७ मते मिळाली होती. त्यांचा १,६८,३६८ मतांनी पराभव झाला होता. पण भाजपने यंदा या मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांनी संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात

२०१४ मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीनाथ मुंडे हे विजयी होऊन खासदार झाले होते. त्यांना एकूण ६,३५,९९५ मते मिळाली होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस यांना ४,९९,५४१ मते मिळाली होती. त्यांचा १,३६,४५४ मतांनी पराभव झाला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर प्रीतम मुंडे यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता.

२००९ मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे गोपीनाथ मुंडे खासदार झाले होते. त्यांना ५,५३,९९४ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश बाबुराव कोकाटे (आडसकर) यांना ४,१३,०४२ मते मिळाली होती. त्यांचा १,४०,९५२ मतांनी पराभव झाला होता.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;