ठाणे लोकसभा निकाल 2024 : राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के, कौल कुणाला?

ठाणे लोकसभा निकाल 2024 : राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के, कौल कुणाला?

शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. असं असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा राजन विचारे यांना संधी दिली. तर दुसरीकडे महायुतीकडून ठाण्याची जागा ही शिंदे गटासाठी सुटली. शिंदे गटाने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी लढत ठाण्यात बघायला मिळाली. या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय?

1984 मध्ये काँग्रेसचे शांताराम घोलप येथून खासदार झाले. भाजपचे राम कापसे 1989 आणि 1991 मध्ये दोनदा निवडून आले. 1996 नंतर ही जागा सलग 4 वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांच्या ताब्यात राहिली. त्यांच्या निधनानंतर 2008 मध्ये येथे पोटनिवडणूक झाली ज्यात त्यांचे पुत्र आनंद परांजपे विजयी झाले. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नायक विजयी झाले होते. मोदी लाटेत ही जागा भाजप-शिवसेना युतीकडे गेली. शिवसेनेचे राजन विचारे 2014 आणि 2019 मध्ये येथून खासदार म्हणून निवडून आले.

2014 मध्ये शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना 5,95,364 मते मिळाली होती. त्यांनी 2,81,299 मतांनी मोठा विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव गणेश नाईक यांचा पराभव केला. त्यांना केवळ 3,14,065 मते मिळाली. त्याच वेळी, 13,174 मतदारांनी NOTA बटण दाबले होते. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने राजन विचारे पुन्हा विजयी झाले, त्यांना 740,969 मते मिळाली. त्याचवेळी त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ 3,28,824 मते मिळाली. राजन विचारे 4,12,145 मतांनी विजयी झाले.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;