नागपूर लोकसभा निकाल 2024: भाजप उमेदवार नितीन गडकरी….., काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे

नागपूर लोकसभा निकाल 2024: भाजप उमेदवार नितीन गडकरी….., काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे

नागपूर लोकसभा मतदार संघात यंदा तिरंगी लढत होती. नागपूरमध्ये भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (bjp candidate nitin gadkari) यांच्या विरोधात काँग्रेसकडून विकास ठाकरे (nagpur congress candidate vikas thakre) निवडणूक मैदानात होते. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीकरून पाठिंबा दिला होता. तसेच 11 अपक्ष सुद्धा रिंगणात आहेत. विदर्भातील उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात असल्यामुळे नितीन गडकरी यांची जागा महत्वाची होती. नितीन गडकरी यांच्या उमेदवारी अर्ज भरतानाही प्रचंड शक्तीप्रदर्शन झाले होते.

नागपूर लोकसभा मतदार संघाचा इतिहास (Nagpur Lok Sabha Seat Winner History)

विदर्भ कधीकाळी काँग्रेसचा गड होतो. नागपूरमध्ये 1996 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रथमच आपले खाते उघडले. भाजपचे बनवारीलाल पुरोहित खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1998 ते 2004 पर्यंत ही जागा पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात गेली आणि विलास मुत्तेमवार सलग चार वेळा खासदार झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नितीन गडकरी यांना येथून उमेदवारी दिली. नागपूर हा नितीन गडकरी यांचा गृह जिल्हा आहे. गडकरींनी काँग्रेसचे दिग्गज नेते विलास मुत्तेमवार यांचा 2,84,828 मतांनी पराभव केला. गडकरींना 5,87,767 मते मिळाली. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा नितीन गडकरी काँग्रेसचे उमेदवार नानाभाई फाल्गुन राव पाटोळे यांचा पराभव करून विजय मिळवले.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;