नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, विदर्भ लोकसभा निवडणूक निकाल LIVE Counting and Winner Updates
लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. देशाच्या निकालाकडे जगाचे लक्ष असणार आहे. एक्झिट पोलमधून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण, महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला जास्त जागा मिळताना दिसत आहे. त्यातही विदर्भाने नेहमी भाजपच्या बाजूने मतदान केले आहे. विदर्भात केंदीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी विरुद्ध कॉंग्रेसचे विकास ठाकरे ही लढत सर्वाधिक महत्वाची मानली जात आहे. तर, अमरावतीमध्ये नवनीत राणा, अकोलामध्ये प्रकाश आंबेडकर, रामटेकमध्ये शिंदे गटाचे राजू पारवे या महत्वाच्या लढतीमध्ये जनता कुणाला पसंती देणार हे स्पष्ट होणार आहे. विदर्भातील एकूण 10 लोकसभा मतदार संघापैकी किती मतदारसंघावर भाजपचे कमळ फुलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विदर्भातील निकालाच्या सर्व अपडेट्स टीव्ही9 मराठीवर पाहा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List