लोकसभेच्या निकालाआधी हालचाली, जोरदार खलबतं, कोण जिंकणार?

लोकसभेच्या निकालाआधी हालचाली, जोरदार खलबतं, कोण जिंकणार?

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आलाय. सकाळी 8 वाजतापासून EVMमधील मतमोजणी सुरु होईल आणि देशात पुन्हा मोदी येणार की इंडिया आघाडीची सत्ता याचा फैसला होईल. खटाखट आणि फटाफटवरुन प्रचार जोरदार रंगला होता. पण निकालाआधी जे एक्झिट पोल समोर आलेत, त्यात फटाफटा जागा तर भाजप आणि एनडीएच्याच बाजूनं दाखवण्यात आल्यात. TV9पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार NDA 346 आणि इंडिया आघाडीला 162 जागांचा अंदाज आहे.
आज तक अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, NDAला 361-401 जागा देण्यात आल्यात. म्हणजे भाजपचा 400 चा नारा या पोलमध्ये पूर्ण करण्यात आलाय. आणि इंडिया आघाडीला 131-166 जागांचं भाकीत आहे.

C व्होटरच्या सर्व्हेनुसार NDA ला 353-383 जागा देण्यात आल्यात. तर इंडिया आघाडीला 152-182 जागांचा अंदाज आहे. तर या सर्व्हेवरुन राहुल गांधींनी टीका करत मोदी पोल म्हटलंय आणि इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केलाय. तर सोनिया गांधींनीही एक्झिट पोलच्या विपरित निकाल लागतील असं म्हटलंय.

जवळपास सर्वच सर्व्हेत मोदींची हॅटट्रिक होताना दिसतेय. मात्र एक सर्व्हे हा वेगळा आहे, ज्यात इंडिया आघाडीची सत्ता येण्याचे संकेत आहेत. DB LIVEअर्थात देशबंधूच्या एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीला 260-295 जागा दाखवण्यात आल्यात. तर भाजप NDA आघाडीला 215-245 जागांचा मिळतील असं सांगण्यात आलंय. इतरांना 24-48 जागांची शक्यता आहे. म्हणजेच या सर्व्हेनुसार भाजपला धक्का आहे. तर इंडिया आघाडीला सत्ता मिळताना दिसतेय.

महाराष्ट्र बद्दल बोलायचं झालं, तर देशबंधूच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 18-20 आणि महाविकास आघाडीला 28-30 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय. याचाच अर्थ महाराष्ट्रात महायुतीवर महाविकास आघाडी भारी पडताना दिसतेय.

निकालाआधी जोरदार खलबतं

निकालाच्याआधी दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत बैठकाही झाल्या आहेत. दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांच्या घरी निकालाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. ज्यात गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संघटनमंत्री बी.एल.संतोष, सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक झाली. तर उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांची ऑनलाईन बैठक घेत मतमोजणीवरुन सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

देशाच्या निकालासह महाराष्ट्राच्या निकालावरही खास नजर असेल. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर, जनतेचा कौल कोणाला? याचाही फैसला होईल. TV9च्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळताना दिसतेय. आणि सांगलीत काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकतील, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

महायुतीत भाजपचा विचार केला तर भाजपचे 18 खासदार दाखवण्यात आलेत. शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही नाही म्हणजे झिरो जागा मिळतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 14 खासदार निवडून येतील असं भाकीत आहे. काँग्रेसचे 5 खासदार म्हणजेच 2019च्या तुलनेत 4 खासदारांचा फायदा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा दाखवण्यात आलेत.

इकडे अपक्ष आमदार रवी राणांनी उद्धव ठाकरेंवरुन मोठा दावा केलाय. मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आणि 20 दिवसांतच उद्धव ठाकरे मोदींसोबत येणार, असा दावा राणांनी केला. आता प्रतीक्षा निकालाची आहे… आणि काही वेळातच देशाची कमान कोणाकडे, पुन्हा मोदींकडेच… की इंडिया आघाडीकडे सत्तेच्या चाव्या जातील हे स्पष्ट होईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;