उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील का?, महायुतीत काय चाललंय: संजय शिरसाट यांच्या विधानाने चर्चेला फोडणी

उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील का?, महायुतीत काय चाललंय: संजय शिरसाट यांच्या विधानाने चर्चेला फोडणी

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 15 दिवसात उद्धव ठाकरे हे भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या आघाडीत येतील असा दावा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यावरून चर्चांना उधाण आलेलं असतानाच आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांना एनडीएत घ्यायचं की नाही हे वेळ सांगेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एवढी टोकाची टीका केल्यानंतर उद्धव ठाकरे येतील असं वाटत नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्याच्या होऊ घातलेल्या निकालावरही भाष्य केलं. आता धाकधूक वाढू लागली आहे. पण ही धाकधूक आमची नाही, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची आहे. आमचे उमेदवार निश्चिंत आहेत, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.

एकमेकांच्या उरावर बसतील

संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात बऱ्याच दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. उद्याचा निकाल येऊ द्या, त्यानंतर पाहा काय घडेल. हे लोकं एकमेंकांच्या उरावर बसून भांडणं करतील, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला.

तुम्हीही लग्नाला गेला होता

मराठवाड्यात महायुतीतच येणार आहे. तिथे आमचाच विजय निश्चित आहे. संजय राऊत यांनी आपल्या पक्षात काय सुरू आहे ते पाहावं. तुम्हीही अंबानींच्या मुलीच्या लग्नाला क्रुझवर गेला होता. तुम्ही फोटो टाकले. मग मोदींवर टीका करण्याचा तुम्हाला काय अधिकार? निवडणुक आयोगावर संशय करणं चुकीचं आहे, असं त्यांनी सांगितलं.

वरिष्ठ निर्णय घेतील

चार जणांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक फ्रेंडली होत असेल तर वरिष्ठ नेते बसून त्याबाबतचा निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पवार मोठे नेते, तोडगा काढू

शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुष्काळाच्या मुद्द्यावर पत्र लिहिलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राज्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर आहे, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात लक्ष घालून सगळ्यांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय. प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्या मतांचा आम्ही आदर करतो. निश्चितच यावर तोडगा निघेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;